Jalna rain shortage : पावसाचे अलर्ट कोरडे,पाण्याचा ठणठणाट

कुलाबा वेधशाळेकडून २१ ते २५ जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी
Jalna rain shortage
Jalna rain shortagepudhari photo
Published on
Updated on

जालना : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी निर्माण झालेली असतांनाच मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने जिल्ह्यात २१ ते २३ दरम्यान पावसाचा यलो अलर्ट दिला. त्यानंतर २१ व २२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात यलो अलर्ट नंतरही पाऊस पडला नसल्याने दुष्काळात होरपळणाऱ्या जिल्हावासियांची पावसाची प्रतिक्षा कायम असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान कुलाबा वेधशाळेच्यावतीने यलो अलर्ट देण्यात आला आहे.२२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता या अंदाजात वर्तविण्यात आली होती. २३ सप्टेंबरलाही अशाच प्रकारच्या हवामानाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २४ सप्टेंबर रोजी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस, तर २५ सप्टेंबर रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Jalna rain shortage
Jalna Crime : सोन्याचे आमिष दाखवून जबरी चोरी; दोन आरोपी अटकेत

जिल्ह्यात यंदा पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन खरीपाच्या पिकांसह पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. यलो अलर्ट जारी केल्याने अपेक्षित पाऊस पडल्यास शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पावसासोबत वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

वादळी वारे व विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. झाडे, विजेचे खांब, धोकादायक इमारती तसेच उघड्या मैदानात थांबणे टाळावे. शेतकऱ्यांनीही हवामानाची स्थिती लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनपूर्वक करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Jalna rain shortage
Jalna illegal pan masala seizure : सुगंधित पानमसाला व जर्दा जप्त; दोघांवर गुन्हा

हवामान विभागाच्या सूचनांनुसार जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.यापुर्वीही पावसाचे अंदाज चुकीचे ठरल्याने पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

भाकीत कोरडेच

जिल्ह्यातील आठही तालुक्यांत पावसाअभावी खरीप पिके हातातून गेली आहेत.दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनणार आहे. अशा परिस्थितीत वेधशाळेच्या अंदाजाने जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी २१ व २२ सप्टेंबर रोजी पाऊस न पडल्याने हवामान विभागाचे भाकीत कोरडेच जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news