jowar tur price Jalna : ज्वारी ४,५०० रुपये, तर तुरीला ७,७०० रुपये भाव

बाजार समितीत ६,०६० क्विंटल शेतमालाची आवक
jowar tur price Jalna
ज्वारी ४,५०० रुपये, तर तुरीला ७,७०० रुपये भावpudhari photo
Published on
Updated on

जालना : कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना येथे शुक्रवार (दि. २० जून) विविध शेतीमालाची एकूण ६ हजार ६० क्विंटल आवक नोंदविण्यात आली. बाजार समितीत ज्वारीला ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा कमाल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तर तुरीचा सरासरी दर ७ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिला.

बाजार समितीच्या दैनंदिन अहवालानुसार, गव्हाची १,१९२ क्विंटल आवक झाली असून त्याला २,२५० ते २,४६५ रुपये दर मिळाला. ज्वारीची १,४४८ क्विंटल आवक नोंदविण्यात आली असून तिला २,४०० ते ४,५०० रुपये भाव मिळाला. बाजरीची २५६ क्विंटल आवक झाली असून सरासरी दर २,३५० रुपये राहिला.

jowar tur price Jalna
Jalna tur price : तुरीला 8,180 रुपयांचा उच्चांकी भाव

तूर या प्रमुख कडधान्याची ७८५ क्विंटल आवक झाली. तुरीला ६,००० ते ८,१९० रुपये दर मिळाला असून सरासरी भाव ७,७०० रुपये राहिला. हरभऱ्याची सर्वाधिक १,३९४ क्विंटल आवक झाली. सरासरी दर ५,७०० रुपये प्रतिक्विंटल नोंदविण्यात आला.

jowar tur price Jalna
jowar tur dal price Jalna : ज्वारीला 4,350 तर पांढऱ्या तुरीला 8,151 चा भाव

शनिवारचे ठळक बाजारभाव (प्रति क्विंटल)

  • ज्वारी : कमाल ४,५०० रुपये

  • तूर : कमाल ८,१९० रुपये,

  • हरभरा : सरासरी ५,७०० रुपये

  • सोयाबीन : सरासरी ६,६०० रुपये

  • उडीद : ७,४०० रुपये

  • सूर्यफूल : ६,५०० रुपये

  • राई : ६,९०० रुपये

  • एकूण आवक : ६,०६० क्विंटल

  • मूल्यांकन : २,६४,७६,७००

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news