Jalna tur price : तुरीला 8,180 रुपयांचा उच्चांकी भाव

जालना बाजार समिती; ज्वारी 3,200 वर स्थिरावली!
Jalna tur price
Jalna tur pricepudhari photo
Published on
Updated on

जालना : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार, (दि. 25) शेतमालाची दमदार आवक पाहायला मिळाली. दिवसभरात एकूण 15 हजार 369 क्विंटल शेतमालाची आवक झाली असून, बाजारपेठेत 5 कोटी 2 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कमेची उलाढाल नोंदवली गेली. आजच्या सौद्यांमध्ये पांढऱ्या तुरीला प्रति क्विंटल कमाल 8,180 रुपये असा सर्वोच्च दर मिळाला, तर मक्याची आवक सर्वाधिक राहिली.

बाजार समितीत आज पांढऱ्या तुरीची 931 क्विंटल आवक झाली. तिला किमान 6,100 तर कमाल 8,180 रुपये भाव मिळाला; तर सरासरी भाव 7,700 रुपयांवर स्थिरावला. लाल तुरीलाही सरासरी 7,700 रुपयांचा दर मिळाला.

Jalna tur price
पपई, टरबूज, खरबुजाची बाजारात धूम

शेतकऱ्यांचा हुकमी एक्का असलेल्या पिवळ्या सोयाबीनची 739 क्विंटल आवक झाली असून, त्याला 7,200 रुपये प्रति क्विंटल असा मजबूत सरासरी भाव मिळाला. ज्वारीची (शाळू) 2,892 क्विंटल आवक झाली असून तिने 3,200 रुपयांचा सरासरी टप्पा गाठला.

सध्या बाजारात लाल मक्याची मोठी आवक सुरू आहे. आज तब्बल 4,819 क्विंटल मक्याची आवक झाली, ज्याला सरासरी 1,875 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. त्याखालोखाल गव्हाची (जाती 496) 3,323 क्विंटल आवक झाली असून, गव्हाला कमाल 2,450 आणि सरासरी 2,325 रुपये भाव मिळाला.

Jalna tur price
SIP SWP Retirement Planning | निवृत्तीनंतर श्रीमंतीत जगण्यासाठी एसआयपी + एसडब्ल्यूपी

बाजार समितीचे प्रशासक परमेश्वर वरखडे आणि सचिव भरत तनपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारात आवक उत्तम असून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत आहे.

इतर शेतमालाची स्थिती

हरभरा (गावरान): 1,107 क्विंटल आवक, सरासरी 5,700 रुपये दर.

बाजारी (हिरवी): 1,179 क्विंटल आवक, सरासरी 2,200 रुपये दर.

उडीद (काळा): आवक कमी (20 क्विंटल) असली तरी 7,542 रुपये असा स्थिर दर मिळाला.

गुळ (पिवळा): 16 क्विंटल आवक, सरासरी 3,925 रुपये दर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news