Custard apple : नऊ वर्ष जपलेल्या सीताफळाच्या चौदाशे झाडांवर फिरवला जेसीबी

पिंपळगाव रेणुकाई : बाजारात कवडीमोल भाव, उत्पादन खर्च परवडेना
Custard apple
Custard apple : नऊ वर्ष जपलेल्या सीताफळाच्या चौदाशे झाडांवर फिरवला जेसीबीFile Photo
Published on
Updated on

JCB rolled over 1400 custard apple trees that had been preserved for nine years

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : सीताफळाला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने आणि वाढता उत्पादनखर्च परवडत नसल्यामुळे हताश झालेल्या पिंपळगाव रेणुकाई येथील एका शेतकऱ्याने आपल्या नऊ वर्षांपासून जपलेल्या सीताफळाच्या बागेवर जेसीबी फिरवून ती उद्ध्वस्त केली.

Custard apple
Jalna Political News : तिन्ही नगरपालिकेत युती-आघाडी ठरेना, जागा वाटपाचा तिढा कायम

पिंपळगाव रेणुकाई येथील यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सीताफळाचे पीक चांगले येईल अशी आशा शेतकऱ्यांमध्ये होती. मात्र, पीक तयार होत असतानाच झालेल्या अतिवृष्टीमुळे सीताफळाच्या बागांचे मोठे नुकसान झाले.

झाडांवरील फळे सडून गेली, तर काही ठिकाणी झाडेच मुळापासून उखडली गेली. हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाच्या कोपामुळे हिरावले गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ८ ते १२ रुपये किलो असा अल्प दर सिताफळाला अतिवृष्टीतून जे काही थोडेफार पीक वाचले, त्यातून किमान नुकसानीची भरपाई होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती.

Custard apple
Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न

पण, बाजारात सीताफळाला फक्त ८ ते १२ रुपये प्रतिकिलो इतका अत्यल्प दर मिळत आहे. या दरात फळे तोडणे, वाहतूक आणि विक्रीचा खर्चही निघत नसल्याचे शेतकरी दरवर्षी आर्थिक संकटात सापडत असल्याचे सांगितले.

नऊ वर्षांपूर्वी चौदाशे सीताफळाची झाडाची लागवड केली होती. या कालावधीत बागेच्या देखभालीसाठी, खते, पाणी आणि मजुरीवर लाखो रुपये खर्च केला. खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा मेळ बसत नसल्याने, आर्थिक नुकसान झाले आहे. उत्पादन खर्च निघला नाही. यामुळे बाग उद्ध्वस्त केले आहे
. - भगवान गावडे, शेतकरी, पिंपळगाव रेणुकाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news