Manoj Jarange : जरांगे यांच्या ऑडिओ बॉम्बने खळबळ

शिवसेना शिंदे गट, भाजपमध्ये खळबळ, सखोल चौकशीची मागणी
Manoj Jarange
Manoj Jarange : जरांगे यांच्या ऑडिओ बॉम्बने खळबळfile photo
Published on: 
Updated on: 

Jarange’s ‘audio bomb’ causes a stir

अंबड, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना शिंदे गटाचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला ५०० कोटी रुपये मिळाल्याचा उल्लेख असणारी तथाकथित ऑडिओ क्लिप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सादर करून शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली. या क्लिपचा संदर्भदेत आपल्याविरोधात गेल्या तीन वर्षांपासून षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Manoj Jarange
Jalna Drought : पिंपळगाव रेणुकाईच्या बाजारावर दुष्काळाचे सावट

मराठा आरक्षण आंदोलन बदनाम करून ते बंद पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली गुरुवारी (दि. २२) अंकुशनगर येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे यांनी संबंधित ऑडिओ क्लिप जारी केली. या संभाषणात काही व्यक्तींची नावे, राजकीय नेत्यांशी संपर्क, आर्थिक व्यवहार आणि आपल्याविरोधात प्रचार करण्यासंदर्भातील चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, या ऑडिओ क्लिपची सत्यता, संभाषणाची वेळ आणि त्यातील व्यक्तींची ओळख यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीला विरोध करण्यासाठी मोहीम राबविणे आणि आपल्याला वैयक्तिक लक्ष्य करणे यासंदर्भात संभाषणात चर्चा असल्याचेही त्यांनी म्हटले. "एकनाथ शिंदे यांनी आपण पैसे घेतले नाहीत आणि दिलेही नाहीत, असे म्हटले असेल, तर मग हे षड्यंत्र कोण रचत आहे, याचा शोध घेतला पाहिजे," असे जरांगे म्हणाले. या कथित संभाषणामागील व्यक्तींची ओळख पटवून संबंधित प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

आपल्याविरोधात काम करणाऱ्या व्यक्ती आणि कथित नेटवर्कचा शोध घेणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे सांगत जरांगे यांनी फडणवीस आणि शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले. ऑडिओ क्लिपची चौकशी झाली नाही, तर या कथित षड्यंत्रामागे कोण आहे, याबाबत प्रश्न निर्माण होतील, असेही त्यांनी नमूद केले. कथित संभाषणात निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर यांच्यासह काही व्यक्तींची नावे घेतली जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

Manoj Jarange
Jalna Namo installment | शेतकरी ‘नमो’च्या हप्त्यांच्या प्रतीक्षेत! शेतीचे आर्थिक गणित कोलमडले

राजकीय पक्षांचा निधी आपल्याविरोधात वापरला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला. गेल्या तीन वर्षांपासून आपल्याविरोधात वातावरण तयार केले जात असूनमराठा समाजाच्या आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले काम थांबविण्यासाठी दबाव आणला जात असल्याचेही ते म्हणाले. "माझ्यासारखा प्रामाणिक माणूस मराठा समाजाला मिळणार नाही," असे सांगत त्यांनी समाजबांधवांना आपल्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. आपल्याविरोधात बोलणाऱ्यांना राजकीय पाठबळ दिले जात असल्याचा आरोप करत त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही सावध राहण्याचा इशारा दिला.

आणखी पुरावे असल्याचा दावा

माझ्याकडे आणखी काही माहिती आहे. तुमचे पायसुद्धा जमिनीवर थांबणार नाहीत. शिंदे साहेब तुम्ही कोणाविरोधात व्हॉट्सअॅप कॉल वर बोललात. ते सुद्धा माहिती, शिंदे साहेब माझ्या विरोधात तुमची लोक बोलणे बंद करा, नाहीतर 2-3 महिन्यांनी आणखी एक काढणार, शिंदे साहेब तुमचा स्वाभिमान होता, तुम्ही माझ्या विरोधात टीम फिरवू नका. तुमचा कोणता मंत्री काय पुरवतो हे मला माहिती आहे. आमच्यावर खोटे गुन्हे कसे होतात हे सुद्धा आम्हाला माहिती आहे, बीडमध्ये लोकांवर गुन्हे दाखल करत आहेत. शिंदे साहेब तुम्ही सावध व्हा. फडणवीस साहेब मी खोलात गेलो तर माझ्याकडे भयंकर गोष्टी आहेत. तुम्ही थांबले नाही तर मी सगळे उघडे करणार, शिंदे साहेब हाताखाली धरलेल्या लोकांमुळे तुमचे करिअर उद्ध्वस्त होईल. हे मी सरनाईक, उदय सामंत, चिवटे, सत्तार, सुहास कांदे, दादा भुसे केसरकर यांना सांगितले आहे. तुमचे करिअर धोक्यात येतील, नारायण गडाचा निधी कोणी रोखला हे मला माहिती आहे, असेही पुढे मनोज जरांगेंनी म्हटले

डॅमेजचा प्रयत्न सुरू करा जरांगे यांनी सादर केलेल्या एका क्लिपमध्ये निरंजन डावखरे, दरेकर यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे, पक्षातून (भाजप) कोणी बोलायला तयार नाही असा उल्लेख या क्लिपमध्ये आहे. शरद पवार पैसे देत आहेत असा फक्त उल्लेख यामध्ये आहे. कॉन्फरन्समधील ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख करण्यात आला आहे, तर या ऑडिओ क्लिपमध्ये आर्थिक गोष्टींवरती भाष्य केल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात जरांगेंच्या विरोधात बोलायला लोक तयार आहेत, त्याला (जरांगेंना) आवरलं नाही तर मराठवाड्यात तुम्हाला गिळून टाकेल, त्याला डॅमेज करायचा प्रयत्न सुरू करायला हवा, असेही या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्या दोन व्यक्तीच्या संभाषणातून दिसून येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी : सामंत

जरांगे यांनी जारी केलेल्या क्लिपच्या माध्यमातून कोणी कुटील डाव आखत असेल तर त्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करावी, अशी मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांना उत्तर दिले आहे. कोण एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात आहे, कोण जरांगे यांच्या विरोधात आहेत? कोण कोणाला बदनाम करत आहे? कोणी कोणाला सुपारी दिली ? या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत. मी तर जरांगे यांना विनंती करणार आहे की, तुमच्याकडे अशी काही नावे असतील तर जाहीर करून टाका. त्यामुळे कमीत कमी बदनामी करणाऱ्याला भीती तर वाटली पाहिजे, असे ते म्हणाले.

शालिनी यांनी आरोप फेटाळले

या क्लिपमध्ये भाजपच्या श्वेता शालिनी यांचे नाव घेतले जात आहे. त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज आपला नाही. या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, असे त्या म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news