Jalna Drought : पिंपळगाव रेणुकाईच्या बाजारावर दुष्काळाचे सावट

दसरा सण असूनही बाजारात शुकशुकाट; पिके गेल्याने शेतकरी हतबल
Jalna Drought
पिंपळगाव रेणुकाईः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील आठवडे बाजारात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकी कमी झाल्याचे पहावयास मिळाले. pudhari photo
Published on: 
Updated on: 

पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे दसरा सण असूनही मंगळवारच्या आठवडे बाजारात शुकशुकाट असल्याचे पहावयास मिळाले. पिंपळगाव रेणुकाई परिसरात पावसाअभावी खरिपाची पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. त्यामुळे मंगळवारी भरणाऱ्या बाजारात शुकशुकाट दिसून आला.

मंगळवारी दसरा सण असल्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात. परिसरातून व्यापारीही मोठ्या संख्येने बाजारात येतात. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. सोयाबीन, मका कापूस, तूर पिके हातातून गेली आहेत.

Jalna Drought
Jalna Farmers Fertilizer Scheme : खत खरेदी आता मोबाईलवर!; आजपासून ‘एफएफएस’ प्रणाली

शेतकऱ्यांकडे विकण्यासाठी मालच नसल्याने बाजारात आवक घटली आहे. तर दुसरीकडे नागरिकांकडे खरेदीसाठी पैसे नसल्याने भाजीपाला, धान्य, कपडे, भांडी बाजारालाही फटका बसला आहे. भाजीपाल्याचे दर दुप्पट झाल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

दरवर्षी दिवसात दोन ते तीन लाख रुपयांची उलाढाल बाजारात होते, यंदा ती पन्नास हजारांवर आली आहे. जनावरांच्या बाजारातही तीच स्थिती आहे. चारा टंचाईमुळे शेतकरी जनावरे विक्रीसाठी आणत आहेत. गावातील अर्थचक्र पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.

Jalna Drought
Chhatrapati Sambhajinagar Crime : बहिणीला का छेडतो ? म्हणत १० वीच्या विद्यार्थ्याचे अपहरण

जनावरांच्या किमतीत घट

पिंपळगाव रेणुकाईे येथे भरणाऱ्या आठवडे बाजारात ग्राहकांची संख्या कमी झाली असतानाच दुसरीकडे जनावरे विक्रीची संख्या वाढली आहे.त्यामुळे जनावरांच्या किमतीत काहीशी घट झाल्याचे पहावयास मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news