Jalna ST bus accident : बसची उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या जीपला धडक

जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवरील दावलवाडी येथे अपघात
Jalna ST bus accident
जालनाः जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील दावलवाडी गावाजवळ भरधाव बसने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या जीपला धडक दिल्यानंतर बस रस्त्यावच्या बाजूला घसरली.pudhari photo
Published on
Updated on

जालना : जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील दावलवाडी गावाजवळ असलेल्या महिको कंपनीजवळ भरधाव एसटीने एसटीने उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या जीपला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अनंत कुलकर्णी किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर बस रस्त्याच्या खाली गेली.

अमरावती आगाराची छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी बस (क्र.एमएच-२०-जीसी-३८१२ ) ही जालन्याहुन छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना दावलवाडीजवळ एका प्रकरणात पंचनामा करण्यासाठी गेलेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या उभ्या जीपला बसने धडक दिली. त्यानंतर बसने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दुचाकीजवळ उभ्या असलेल्या महिलेला बसने धडक दिली. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली. या घटनेत सुदैवाने अनंत कुलकर्णी यांना किरकोळ मार लागला.

Jalna ST bus accident
Jalna rainfall shortage : जालना जिल्ह्यावर दुष्काळाचे गडद संकट!

उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या जीपमधील पोलिस उपनिक्षक पवन राजपुत यांच्यासह महिला शिक्षिका पंच अपघातात जखमी झाले आहेत. या प्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.अपघातात बसमधील प्रवाशांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. बसमधील प्रवाशांना इतर बसमधून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. एसटी महामंडळाकडून अपघातग्रस्त बसची तपासणी केली जाणार आहे.

Jalna ST bus accident
Jalna Crime | लखन तुरे हत्या प्रकरण : फरार दोन आरोपींच्या घाणेवाडी परिसरात आवळल्या मुसक्या

पोलिसांची धाव

अपघातानंतर घटनास्थळी चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news