Jalna Crime | लखन तुरे हत्या प्रकरण : फरार दोन आरोपींच्या घाणेवाडी परिसरात आवळल्या मुसक्या

चंदनझिरा पोलिसांची मध्यरात्री कारवाई; आरोपींंना पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

जालना : शहरातील ढळवळेश्वर परिसरात झालेल्या लखन छगनलाल तुरे (वय ३८) यांच्या हत्या प्रकरणातील दोन फरार संशयित आरोपींना चंदनझिरा पोलिसांनी घाणेवाडी परिसरातून सोमवार, दि. ७ रोजी मध्यरात्री ताब्यात घेतले. शुभम काकासाहेब जोगदंड आणि किशोर देविदास जोगदंड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चारही आरोपींना मंगळवार, दि.८ रोजी न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, शुक्रवार, दि.४ रोजी ढवळेश्वर येथे लखन तुरे यांना बेदम मारहाण झाली होती. छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांच सोमवार, दि. ७ रोजी मृत्यू झाला होता. मारहाणीच्या घटनेनंतर आरोपी शुभम जोगदंड व किशोर जोगदंड हे जालना शहरातून पसार झाले होते. फरार आरोपींना पकडण्यासाठी चंदनझिरा पोलिस ठाण्याचे दोन तपास पथक तयार करण्यात आले. फरार आरोपींचा सलग तीन दिवस शोध घेतला.

Crime News
Jalna Zilla Parishad protest : विकासकामांत टक्केवारी अन् ग्रामपंचायतींची गळचेपी

दरम्यान, सोमवार, ७ रोजी मध्यरात्री पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांना आरोपी राजूर रोडवरील घाणेवाडी शिवारातील एका मोसंबीच्या शेतात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने पथक रवाना करून आरोपींचा पाठलाग केला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, पोलिसांनी त्यांना घेराव घालत शुभम जोगदंड व किशोर जोगदंड या दोघांना बेड्या ठोकल्या.

चौकशीदरम्यान आरोपींनी पैशाच्या देवाणघेवाणीवरून लखन तुरे यांचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार हा व्याजाच्या पैशाचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार करीत आहेत.

Crime News
Sambhajinagar Crime : शेंदूरवादा-सावखेडा रस्त्यावरील खूनप्रकरणी तिघांना जन्मठेपेची शिक्षा

या गुन्ह्यात यापूर्वी चंदनझिरा पोलिसांनी नवनाथ देविदास जोगदंड व राहुल प्रल्हाद कंठाळे यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आता आणखी दोन आरोपी अटक झाल्याने या हत्या प्रकरणातील तपासाला वेग आला आहे.

या पथकाने केली ही कारवाई

पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक डॉ. विक्रम साळी व उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण बिडवे, पोउपनि दिगंबर पवार, रवी देशमाने, मारीओ स्कॉट, सपोउपनि राजेंद्र ठाकूर, प्रशांत देशमुख, कृष्णा तोंग, अभिजीत वायकोस, राजू पवार, शिवाजी जमधडे, अशोक जाधव, सागर खैरे, गजानन काकडे, महिला पोलिस कर्मचारी रेश्मा गुरुम, चालक ठाकूर, जावभाये, स्थानिक गुन्हे शाखेचे पाहेकर सागर व बाळीकर दत्ता वाघुंडे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news