

Jalna Ration kits were distributed to 300 flood-affected families
जालना, पुढारी वृत्तसेवा :
अतिवृष्टी व नाथ सागरातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आणि नदीलगतच्या मंगरूळ, मुद्रेगांव, रामसगाव परिसरातील शेकडो घरात पाणी घुसले. अनेक कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले, शेतमजूर व गरीब जनतेचे जगणे आणखी कठीण झाले. अशा काळात दिवाळीसारखा आनंदाचा सण हळूहळू जवळ येत असताना अनेकांच्या चेहऱ्यावर काळजीचे ढग दाटून आले होते. पण याच दिवाळीत या कुटुंबांच्या जीवनात गोडवा आणणारा एक संवेदनशील उपक्रम राबवण्यात आला. पूरग्रस्त ३०० कुटुंबाना रेशन कीटचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्या आवाहनास प्रतिसाद देत सेंटर फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात (कार्ड) या संस्थेने पूरग्रस्तांना आधार देण्याचा पुढाकार घेतला. संस्थेमार्फत एकूण ३०० रेशन किट्सचे मंगरूळ, मुद्रेगांव, रामसगाव आणि जोगळादेवी येथील गरजू कुटुंबांना करण्यात आले. दहा प्रकारचे जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. विशेष म्हणजे या किटसाठी एकल महिला, विधवा, परित्यक्ता आणि गरीब कुटुंबांना प्राधान्य देण्यात आले.
कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधीर शरणागत आणि भायगव्हाणचे उपसरपंच सुनील कोरडे यांच्या हस्ते पूरग्रस्तांच्या हातात मदतीचे है किट पोहोचले. डोळ्यात अश्रू, चेहऱ्यावर हसू आणि मनात कृतज्ञतेची भावना अशा मिश्र भावनांमध्ये महिलांनी या मदतीचा स्वीकार केला. या उपक्रमासाठी संस्थेचे सचिव पुष्कराज तायडे, अध्यक्ष प्रा. सुर्वणा दांडगे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. रामदास निहाळ, कोषाध्यक्ष सोनिया तेलगड, सहसचिव रघुनाथ शेवाळे, संचालक अॅड. संतोष वानखेडे, संचालक मंगल रसाळ व सुनीता मगरे यांनी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शेकडो कुटुंबांच्या दिवाळीत आशेचा उजेड आला.
गावातील प्रतिष्ठित मान्यवर, महिला व स्वयंसेवक या कार्यक्रमात उपस्थित होते. ही फक्त रेशन किट नव्हती, तर तो मानवतेचा हात होता ज्याने संकटात सापडलेल्या कुटुंबांना दिलासा आणि आशेचा किरण दिला. चौकाट्या किटमध्ये पाच किलो गहू पिठ, पाच किलो तांदूळ, दोन किलो रवा, एक किलो साखर, मीठ, एक लिटर तेल, हळद, मिरची आणि धणे पावडर यांसह दहा प्रकारचे जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. विशेष म्हणजे या किटसाठी एकल महिला, विधवा, परित्यक्ता आणि गरीब कुटुंबांना प्राधान्य देण्यात आले. यावेळी समर्थ बँकेचे संचालक विजयसिंह खरात, उपसरपंच सुनिल कोरडे, मुख्याध्यापक रघुनाथ बारवकर, उपसरपंच मोहन रोडे, अभिषेक खरात, मच्छिंद्र खरात, सुधीर शरणांगत, दादासाहेब राखुंडे, रविंद्र राठोड उपस्थित होते. तर रामसगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तात्यासाहेब चिमणे, उपसरपंच सुनिल कोरडे, संचालक कृउबा नकुल भालेकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, रविंद्र राठोड उपस्थित होते. रामसगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती घनसावंगीचे सभापती तात्यासाहेब चिमणे, उपसरपंच सुनिल कोरडे, संचालक नकुल भालेकर, रविंद्र राठोड उपस्थित होते.
या किटमध्ये पाच किलो गह पिठ, पाच किलो तांदूळ, दोन किलो रवा, एक किलो साखर, मीठ, एक लिटर तेल, हळद, मिरची आणि धणे पावडर यांसह दहा प्रकारचे जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. विशेष म्हणजे या किटसाठी एकल महिला, विधवा, परित्यक्ता आणि गरीब कुटुंबांना प्राधान्य देण्यात आले.
अतिवृष्टी आणि गोदावरी नदीला आलेल्या महापुराचा गोदाकाठच्या मंगरूळ, मुद्रेगांव, रामसगाव आणि जोगळादेवी या गावांना सर्वाधिक फटका बसला. घरात पाणी घुसले. दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. आता कुठे त्या रहिवाशांचे जीवन पुर्वपदावर आले आहे. या गावातील ३०० कुटुंबांना रेशन किटचे वाटप त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत करण्याचे काम होत आहे.