

Diwali Market people Shopping Crowd
आन्वा, पुढारी वृत्तसेवा: दिवाळी सणाला शुक्रवार म्हणजे वसूबारसपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दिवाली सणाच्या अनुषंगाने पणत्या पूजेचे साहित्य, आकाशकंदील, कपडे, फटाके, मिठाईसह सणासाठी लागणाऱ्या अन्य वस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची लगबग दिसून येत आहे.
दिवाळी सणानिमित सपूर्ण कुटुंबीयांस नवीन कपडे खरेदी करण्यात येतात, अंगणात आकर्षक रांगोळी काढण्यात येते, पहाटे व सायंकाळी घराचा परिसर दिवे लावून सुशोभित करण्यात येतो. बच्चे कंपनीसाठी तर दिवाळी सण एक आनंदाची पर्वणी मानली जाते.
नागरिकांसह व्यापारी घराची दुरुस्ती रंगरंगोटी करतात. दिवाळीतील धनत्रयोदशी हा दिवस तर साडेतीन मुहूतपैिकी एक महत्वाचा दिवस असतो. या दिवसाचे औचित्य साधून व्यापारी नवीन उद्योग, व्यवसायाचा शुभारंभ करतात. तर नागरिक नवीन वाहन, घर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने चांदी खरेदीसाठी हा दिवस महत्वपूर्ण मानतात. यामुळे दिवाळी सणात बाज ारपेठेत तेजीचे वातावरण असते. दिवाळी सणात बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
दिवाळीसाठी विविध प्रकारचे आकर्षक आकाशकंदिल पणत्या, विविध रंगांच्या आकर्षक रांगोळी, रांगोळीचे छापे, मेहंदी कोन, पूजेचे साहित्य, अगरबत्ती, रेडिमेड वाती, बत्ताशे, लाह्या, शोभेच्या वस्तु, मूर्ती, फुलांच्या माळा, अंबर, कपडे, साड्या, संगधी उटणे, अत्तर, किराणा वस्तू, फटाके, खमंग फराळ, ड्रायफ्रूटस, मिठाई, दागिने आदी वस्तूंची ग्राहकांकडून खरेदी होत आहे. साडघांच्या सर्वच कापड दुकानांत महिलांची सध्या रेलचेल दिसून येत आहे. बाजारपेठेत महिला व लहान मुलांच्या कपडे खरेदीसाठी पालकांची गर्दी होत आहे. रविवारी बाजारात गर्दी झाल्याचे चित्र तालुक्यातील बाजारात दिसून आले.
पूजेचे साहित्य खरेदीस गर्दी
बाजारात विविध प्रकारच्या लक्ष्मीच्या मूर्ती आणि फोटो उपलब्ध आहेत, ज्यात माती, फायबर, पितळ आणि चांदी यांसारख्या वेगवेगळ्या साहित्यांपासून बनवलेल्या मुर्तीच समावेश आहे. लक्ष्मी आणि गणेश यांच्या एकत्रित मूर्ती आणि फोटो फ्रेम्स देखील उपलब्ध असून ग्राहक खरेदी करताना दिसून येत आहेत.