Jalna electricity disruption : 33 केव्ही वाहिनीवर तार फेकली; 11 गावांचा वीजपुरवठा खंडित

अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल
Jalna electricity disruption
33 केव्ही वाहिनीवर तार फेकली; 11 गावांचा वीजपुरवठा खंडितpudhari photo
Published on
Updated on

जालना ः महावितरणच्या 33 केव्ही वाहिनीवर अज्ञात इसमाने खोडसाळपणे ॲल्युमिनियमची तार फेकल्याने 11 गावांचा वीजपुरवठा 12 तासांपेक्षा अधिक काळ खंडित राहिला. या प्रकरणी अज्ञातावर तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

33/11 केव्ही गोलापांगरी उपकेंद्रातून हिस्वण उपकेंद्राकडे येणारी 33 केव्ही हिस्वण विद्युत वाहिनी आहे. 8 एप्रिल 2026 रोजी रात्री 8.20 वाजेच्या सुमारास ही वाहिनी बंद पडली. महावितरणच्या जालना ग्रामीण-2 शाखेचे कनिष्ठ अभियंता प्रवीण पंडित व त्यांचे सहकारी अरुण पवार, मनोज कावळे, अंकुश गोल्डे यांनी लागलीच पेट्रोलिंग करण्यास सुरुवात केली. तेव्हा बठाण शिवारात या वाहिनीवर अज्ञात व्यक्तीने ॲल्युमिनियमची तार फेकल्याचे आढळून आले.

Jalna electricity disruption
Chandrapur Crime | वरोरा तालुक्यात रेती व्यावसायिकाचा खून: तलवारीने सपासप वार करून नदीत फेकले; डिझेल टाकून वाहने जाळण्याचा प्रयत्न

या तारेमुळे 33 केव्ही वाहिनीचे शॉर्टसर्किट होऊन 11 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यात हिस्वण उपकेंद्रातील हिस्वण, माळी पिंपळगाव, पोकळ वडगाव, रेवगाव, इस्लामवाडी, पुनेगाव, तांदुळवाडी, दुधना काळेगाव, बठाण, दैठणा व काटखेडा या गावांचा वीजपुरवठा 8 एप्रिलच्या रात्री 8.20 पासून ते 9 एप्रिलच्या सकाळी 9.10 वाजेपर्यंत खंडित होता.

Jalna electricity disruption
Nanded gangwar | नांदेडात गँगवॉर; 3 ठार

अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणे वीज वाहिनीवर तार फेकून वीजपुरवठा बंद केला. हा प्रकार महावितरणच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरला. कनिष्ठ अभियंता प्रवीण पंडित यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमावर तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news