

Jalna Police Raid Illicit Liquor Stills and Seize Gutkha
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरात कदीम जालना पोलिसांनी गुटखा, हातभट्टी, जुगारसह कत्तलीसाठी आणलेले गौवंशीय जातीचे दोन बैल पकडुन कारवाया केल्या.
शहरातील जुना जालना भागातील मुजाहेद चौकातील अजंठा पान शॉप, सादात चौक, संजय नगर, रेल्वेस्टेन अशा चार ठिकाणी छापा मारुन पोलिसांनी १ लाख ३१ हजार ३३३ रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
जुना जालन्यात टाटा कंपनीचा ४०७ वाहन क्रमांक २३०२७३ मध्ये कत्तली करित्ता घेवुन जात असलेल्या गोवंशीय जातीच्या दोन बैलासह वाहन असा ४ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कैकाडी मौहल्ला भागात अवैध रित्या गावठी हातभटी दारु अडयावर छापा मारुन पोलिसांनी १ लाख २२ हजार रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आली. या प्रकरणी एका महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
जुना जालन्यातील राहुल नगर भागात पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारुन पाच जणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.