Jalna News : आन्वा गावात घाणीचे साम्राज्य

गावकऱ्यांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, सफाई करण्याची मागणी
Jalna News
Jalna News : आन्वा गावात घाणीचे साम्राज्यfile photo
Published on: 
Updated on: 

Jalna News : Unsanitary due to dirt in Anwa village

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ भारत.. स्वच्छ शहर'चा नारा देत आपले शहर व गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासनाकडून आवाहन करण्यात येते. गाव आणि शहर स्वच्छतेवर मोठा भर देण्यात येत आहे. भोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आन्वा गावाची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न येरणीवर आला आहे.

Jalna News
Crime News : पिन टिपून महिलेच्या खात्यातून ४० हजार लांबवले

गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बर्याटच ठिकाणी गटारे तुंबल्याने परिसरातील रस्त्यावर घाण कचरा टाकण्यात येत असून दुर्गंधीयुक्त घाण पाणी ओसंडून वाहत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात स्वच्छ भारत अभियान तीनतेरा झालेले आहे.

गावात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून तुंबली आहेत. विविध भागात अगोदरच दैनंदिन साफसफाई अभावी नेहमीच दुर्गंधी पसरलेली असताना त्यात या गटारीच्या घाण पाण्याची भर पडली आहे. त्यामुळे इतरांना स्वच्छतेचे शहाणपण शिकवणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयच्या दिव्याखाली अंधार असल्याचे चित्र आहे. गल्लीतल्या रस्त्यावर गटारीचे घाण पाणी वाहत असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे.

Jalna News
Galhati Dam : गल्हाटी धरणात जायकवाडीचे पाणी आणण्यास प्राधान्य द्यावे

प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी नेहमीच मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत गावातील प्रवेशाच्या मुख्य रस्त्यावरच गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने दुर्गंधीमुळे लहान मुले वयोवृद्ध व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिक मात्र त्रासून गेले आहेत. येथील ग्रामपंचायत अधिकारी याकडे लक्ष नसल्याने नागरिकांना याप्रती संताप व्यक्त होत आहे. प्रभागातील नागरी समस्या काय आहेत हे जाणून घेण्याची कधी तसदी घेतलेली नसल्याचे दिसून येत आहे.

आरोग्य धोक्यात

आन्वा हे गाव मराठवाड्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी आजुबाई देवी, पांडुरंग रुक्मिणी विठ्ठल मंदिर, हेमाडपंथी शिव मंदिर, दत्त मंदिरासह धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जातात, मात्र या ठिकाणी अनेक भागांत घाणीचे साम्राज्य पसरले असून येणाऱ्या भाविकांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news