Galhati Dam : गल्हाटी धरणात जायकवाडीचे पाणी आणण्यास प्राधान्य द्यावे

५० हून अधिक गावे, दोन हजार मच्छीमारांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी
Galhati Dam
Galhati Dam : गल्हाटी धरणात जायकवाडीचे पाणी आणण्यास प्राधान्य द्यावेfile photo
Published on: 
Updated on: 

Priority should be given to bringing water from Jayakwadi to the Galhati Dam

अंबड / शहापुर, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील गल्हाटी मध्यम प्रकल्पात कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यासाठी जायकवाडी धरणातून गल्हाटी धरणात पाणी आण्यास प्राधान्य द्यावे. अशी मागणी गल्हाटी धरण संघर्ष समिती, शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान, शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Galhati Dam
Crop damage assessment reports : दिवाळीपूर्वी मदतीची प्रतीक्षा ! पीक पंचनामे अंतिम टप्प्यात

सन १९६४ पासून अस्तित्वात असलेल्या या प्रकल्पावर जवळपास ९० हजार नागरिक अवलंबून आहेत. पाण्याच्या प्रश्नासाठी १९८८ पासून संघर्ष सुरू असूनही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. गुंज योजनेसाठी सात, साष्ट-पिंपळगावसाठी आठ आणि गल्हाटी प्रकल्पासाठी दहा दलघमी पाण्याची मागणी असताना उपलब्ध पाणी केवळ १२ दलघमी असल्याने पाण्याचे नियोजन करताना गल्हाटीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

गल्हाटी धरणात पाणी आणण्यासाठी गोदावरी नदीवर आधारित उपसा सिंचन योजना, कालव्याद्वारे पाणी आणणे आणि पाइपलाइनचा वापर करणे या पर्यायांचा तांत्रिक अभ्यास करावा. तसेच पाण्याअभावी अडचणीत आलेल्या सुमारे दोन हजार मच्छीमारांचे सर्वेक्षण करून त्यांना शासकीय योजनांतून मदत द्यावी. प्रकल्पाला पाणी देण्याबाबत लेखी निर्णय घेऊन कायमस्वरूपी पाणी उपलब्धतेसाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

Galhati Dam
Stray dogs news : अंबडमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद; १५ जणांना चावा

या निवेदनावर गल्हाटी संघर्ष समितीचे अध्यक्ष राधाकिशन मैंद, उपाध्यक्ष पांडुरंग गटकळ, शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा आर. व्ही. छल्लारे, राजू सोळुंके, पत्रकार विष्णू नाझरकर, तान्हाजी धुमाळ, राजेंद्र साळुंखे, अहिल्याजी ढोणे, गोपाळ रोटे, गंगाराम पवळ, पांडुरंग ढोणे, पवन मुंढे, संभाजी सव्वासे, सुरेश पवार, आदेश वाघ आणि पोपट खंडागळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तोडगा काढा

गल्हाटी धरणा परिसरात ५० हून अधिक गावे आहेत., जवळपास २० हजार नागरिक आणि २ हजार मच्छीमार करणारे व्यवासायिक आहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालून गल्हाटी मध्यम प्रकल्पाला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून दिल्यास ५० पेक्षा अधिक गावे, तांडे व वस्त्यांना कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news