Free plastic surgery : १३६ जणांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य !

मोफत प्लास्टिक सर्जरी : जर्मन डॉक्टरांची टीम कुटुंबाचा भाग : आशिमा मित्तल
jalna news
Free plastic surgery : १३६ जणांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य ! file photo
Published on
Updated on

Jalna News: Smiles bloomed on the faces of 136 people

जालना, पुढारी वृत्तसेवा : गेल्या २१ वर्षांपासून जालना शहरात सेवेचा वारसा जपणाऱ्या रोटरी क्लब ऑफ जालनातर्फे आयोजित २१ व्या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा समारोप आणि जर्मन डॉक्टरांचा गौरव सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. २१ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत जालना मिशन हॉस्पिटलमध्ये पार पडलेल्या या शिबिरात जर्मनीहून आलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने १३६ रुग्णांच्या आयुष्यात नवसंजीवनी फुंकली आहे. या मानवतावादी सेवेबद्दल जिल्हा प्रशासनाच्यावतीने हॉटेल मधुबन येथे एका विशेष सोहळ्यात जर्मन डॉक्टरांचा गौरव करण्यात आला.

jalna news
Jalna News : बाटलीबंद संस्कृतीने शहरातील पाणपोई हरवल्या

जन्मजात फाटलेले ओठ, टाळू, आगीत भाजल्यामुळे आलेले व्यंग आणि इतर प्लास्टिक सर्जरीच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया जर्मन डॉक्टरांनी विनामूल्य पार पाडल्या. हॉटेल मधुमनमध्ये जर्मन डॉक्टरांच्या पथकाला निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.

त्या म्हणाल्या, जर्मनीहून हजारो किलोमीटरचा प्रवास करून जालन्यातील गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी येणारे हे डॉक्टर्स आता आमच्यासाठी पाहुणे राहिले नसून, ते जालना जिल्ह्याच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. त्यांच्या या सेवाभावामुळे अनेक चेहऱ्यांवर हास्य फुलले आहे.

jalna news
'एनआरएमसी'च्या माध्यमातून होणार नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन

पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या शिबिरात जिल्हा प्रशासन स्वतःहून अधिक लक्ष घालून सर्वतोपरी सहकार्य करेल. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सुप्रवीन पाखरे, साक्षी उगले, मिशन हॉस्पिटलचे डॉ. सी. डी. मोझेस, रोटरीचे सचिव लक्ष्मीनिवास मल्लावत, प्रकल्प प्रमुख अभय नानावटी, ज्येष्ठ सदस्य सुरेश अग्रवाल, हेमंत ठक्कर, अरुण अग्रवाल, सुरेश मगरे, रमेश मगरे, दीपक बगडिया, रो. सरला अग्रवाल, अर्चना देशपांडे यांच्यासह रोटरी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेह-लडाखचे रुग्ण दाखल रोटरी क्लब ऑफ जालना, रोटरी क्लब बॉम्बे मिडटाऊन आणि जर्मन रोटरी डॉक्टर वॉलेंटियर ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या शिबिरात काश्मीरमधील लेह-लडाख आणि कोलकता येथील रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळ रोटरीने हा सेवेचा यज्ञ सुरू ठेवला आहे. जर्मन डॉक्टरांची टीम आणि मिशन हॉस्पिटलच्या सहकार्यामुळेच आज लडाखसारख्या दुर्गम भागातूनही रुग्ण विश्वासाने येथे येतात. ही रुग्णसेवाच आमच्यासाठी खरी ईश्वरसेवा आहे.
वर्षा पित्ती, अध्यक्षा, रोटरी क्लब, जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news