Jalna News : कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या सात गोवंशीय जनावरांची सुटका

कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवलेल्या सात गोवंशीय जनावरांची कदीम जालना पोलिसांनी सुटका केली.
Jalna News
Jalna News : कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या सात गोवंशीय जनावरांची सुटकाfile photo
Published on
Updated on

Jalna News : Rescue of seven bovine animals tied for slaughter purpose

जालना, पुढारी वृत्तसेवा : कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवलेल्या सात गोवंशीय जनावरांची कदीम जालना पोलिसांनी सुटका केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास युसूफ कॉलनी, जुना जालना परिसरात करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Jalna News
Jalna News : बाजार समितीत अद्रक, लसूण, डाळिंब तेजीत

कदीम जालना पोलिस ठाण्याच्या पथकाला युसूफ कॉलनी परिसरात गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. यावेळी शकील अब्दुल बासेद कुरेशी यांच्या मालकीच्या फ्याच्या शेडमध्ये सात गोवंशीय जनावरे आढळून आली.

या जनावरांना चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता निर्दयतेने दोरीने बांधून गोठ्यामध्ये कोंबून ठेवण्यात आले होते. जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेल्या सात गोवंशीय जनावरांची किंमत सुमारे ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

याप्रकरणी आरोपी शकील अब्दुल बासेद कुरेशी याच्याविरुद्ध महाराष्ट्र गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा तसेच पशुसंरक्षण अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्या जनावरांची नियमानुसार सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

Jalna News
Jalna News : मॅजिकच्यावतीने आयडिया हॅकथॉन स्पर्धेचे आयोजन

यांनी केली कारवाई

पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू, अपर पोलिस अधीक्षक साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कदीम जालना पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news