Jalna News : मॅजिकच्यावतीने आयडिया हॅकथॉन स्पर्धेचे आयोजन

नाविन्यपूर्ण व्यावसायिक कल्पनांना मिळणार व्यासपीठ
Jalna News
Jalna News : मॅजिकच्यावतीने आयडिया हॅकथॉन स्पर्धेचे आयोजनfile photo
Published on
Updated on

Idea Hackathon competition organized by MAGIC

जालना, पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला उद्योग-व्यवसायाची दिशा देऊन त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे रूपांतर प्रत्यक्ष व्यवसायात करण्यासाठी मॅजिक इन्क्युबेशन सेंटर, आयटीआय जालना यांच्या वतीने 'आयडिया हॅकेथॉन २०२६' या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Jalna News
Shivbhojan Thali : 'शिवभोजन' चालकांचे तीन महिन्यांचे अनुदान लटकले

या स्पर्धेत जालना जिल्ह्यातील आयटीआयमधील प्रशिक्षणार्थी तसेच इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, कृषी, कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालये आणि शाळांमधील विद्यार्थी सहभागी होऊ शकणार आहेत.

विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यावर, अनुभवावर आणि परिसरातील समस्या ओळखून त्यावर आधारित नाविन्यपूर्ण, उपयुक्त आणि व्यावसायिक स्वरूपाच्या कल्पना सादर कराव्यात, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनेमध्ये एखाद्या समस्येवर प्रभावी उपाय, नवीन उत्पादन, सेवा किंवा तंत्रज्ञानाधारित व्यवसायाची संकल्पना असू शकते. उत्कृष्ट कल्पनांची निवड करून त्यांचे प्रत्यक्ष सादरीकरण ग्रँड फायनलेमध्ये केले जाणार आहे.

Jalna News
जालना-जळगाव रेल्वे मार्ग, कारणे दाखवा नोटीस

स्पर्धेत २० कल्पनांची निवड केली जाणार आहे. त्यात आयटीआय विभागातील १०, आयटीआयव्यतिरिक्त शाळा-महाविद्यालयांमधील १० उत्कृष्ट कल्पनांना योग्य पारितोषी देण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कल्पनांना केवळ पारितोषिक देऊन थांबविले जाणार नाही. मॅजिक इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून इन्क्युबेशन, तांत्रिक सहाय्य, तज्ज्ञ मेंटॉर्सचे मार्गदर्शन, व्यवसायविषयक सल्ला, नेटवर्किंग आणि पुढील विकासासाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

यामुळे विद्यार्थ्यांना 'आयडीया टु इन्कम या संकल्पनेनुसार आपल्या कल्पनेचे रूपांतर प्रत्यक्ष व्यवसायात करण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना ऑनलाइन लिंक, QR कोड, स्कॅनरच्या माध्यमातून २५ सप्टेंबर पर्यंत सादर करता येणार आहेत. मॅजीकमुळे विद्यार्थ्याच्या कल्पनांना पंख मिळणार आहे.

कल्पनांना मॅजीक देणार व्यवसायाची दिशा

जालना जिल्ह्यातील सर्व आयटीआय, शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या नाविन्यपूर्ण व्यावसायिक कल्पना सादर कराव्यात आणि 'आयडिया हॅकेथॉन 2026 'मध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन मॅजिक इन्क्युबेशन सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मॅजीक व्यवसायाची दिशा देणार आहे.

६ ऑक्टोबरला ग्रँड फायनल

प्राप्त झालेल्या नाविन्यपूर्ण कल्पनांमधून निवडलेल्या उत्कृष्ट कल्पनांचे प्रत्यक्ष सादरीकरण ६ ऑक्टोबर २०२६ रोजी मॅजिक इन्क्युबेशन सेंटर, आयटीआय जालना येथील वर्कशॉपमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ग्रँड फायनलेमध्ये केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news