Jalna News : बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक; मिळाला ६,९५० रुपये दर !

जालना कृषी उत्पन्न बाजारात शेतमालाची आवक वाढल्याचे दिसून आले आहे.
Jalna News
Jalna News : बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक; मिळाला ६,९५० रुपये दर !file photo
Published on: 
Updated on: 

Record arrival of soybeans at the Agricultural Produce Market Committee (APMC); fetched a price of ₹6,950!

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना कृषी उत्पन्न बाजारात शेतमालाची आवक वाढल्याचे दिसून आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पिवळ्या सोयाबीनची तब्बल ११, ३७५ क्विंटल इतकी विक्रमी आवक नोंदवली गेली असून, त्याला सर्वसाधारण ६,९५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. बाजार समितीमध्ये एकूण १५,१०० क्विंटल शेतमालाची आवक झाली असून, उलाढालीचे एकूण मूल्य ९ कोटी २५ लाख २५ हजार २५० रुपयांवर पोहोचले आहे. पांढऱ्या तुरीने कमाल १०,०८० रुपयांचा उच्चांकी दर गाठला असून, सर्वसाधारण दर ९,५०० रुपये राहिला.

Jalna News
Water shortage : पाणीटंचाईचे चटके ! जिल्ह्यात ४० टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा

शाळू ज्वारीची १०८६ क्विंटल आवक होऊन कमाल दर ८,०४१ रुपये मिळाला, तर लाल मक्याला सर्वसाधारण २,५५० रुपये दर मिळाला. मुगाला कमाल ९,२५० रुपये आणि काळ्या उडदाला कमाल ९,१०० रुपयांपर्यंत दर मिळाला. रेशीम कोषाला सर्वाधिक ८१,५०० रुपये कमाल दर मिळाला, तर मोसंबीची ५१२ क्विंटल आवक होऊन सर्वसाधारण दर १,०५० रुपये नोंदवला गेला.

रेशीम कोषला मिळाला ८१ हजारांचा भाव

बाजारा समितीत पिवळा गुळाची १३० क्विंटल इतकी आवक झाली असून, कमाल भाव ४,१५५ इतका मिळाला तर किमान भाव ३,८५० तर सरासरी ४,००० रुपये दर मिळाला. लाल गुळाची एकूण ४ क्विंटल आवक झाली. कमाल भाव ३,७५०, कमाल भाव ३,६०० रुपये तर सरासरी भाव हा ३,६०० रुपये इतका राहिला.

Jalna News
Bhokardan : पावसाअभावी तूर संकटात; लाखोंचे नुकसान

रेशीम कोष ची २ क्विंटलची आवक झाली. कोषाला कमाल भाव ८१,५०० तर किमान भाव ७७,५०० तर सरासरी ७७,५०० रुपये दर राहिला. शिवाय, मोसंबीची ५१२ क्विंटलची आवक झाली. कमाल भाव २,१५३, किमान भाव ५०० तर सरासरी १,०५० रुपये दर मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news