Jalna News : जि.प. प्रशालेत अधिकाऱ्यांची तपासणी

शाळेतील हलगर्जीपणावर ओढले कडक ताशेरे
Jalna News
Jalna News : जि.प. प्रशालेत अधिकाऱ्यांची तपासणीfile photo
Published on
Updated on

Jalna News: Inspection of officials in Z.P. School

जामखेड, पुढारी वृत्तसेवा : अंबड तालुक्यातील जामखेड येथील जिल्हा परिषद प्रशालेस सोमवारी गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी तसेच गटशिक्षणाधिकारी रवी कवडे यांनी अचानक भेट देत शाळेतील विविध सुविधा व योजनांचा आढावा घेतला. या पाहणी दरम्यान अनेक गंभीर त्रुटी समोर आल्याने अधिकाऱ्यांनी शिक्षक व व्यवस्थापनाची चांगलीच कानउघाडणी केली.

Jalna News
बालकामगार कृती दलाची कारवाई; १२ वर्षीय बालकाची सुटका

जामखेड येथील जिल्हा परिषद प्रशालेबाबत काही दिवसांपासून शाळेतील गैरप्रकार, चोरीच्या घटना, स्वच्छतेचा अभाव तसेच शिक्षकांच्या वेळेवर उपस्थितीबाबत गंभीर बाबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या गेल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन परिस्थितीची तपासणी केली.

पाहणी दरम्यान शाळेत स्वच्छतागृहाची सुविधा नसणे, वर्गखोल्यांची जीर्ण अवस्था तसेच स्वच्छता व्यवस्थेचा अभाव स्पष्टपणे दिसून आला. विद्यार्थ्यांना आरोग्यदायी व सुरक्षित वातावरण मिळत नसल्याने अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शाळेतील काही शिक्षक वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारीही समोर आल्या. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येताच अधिकाऱ्यांनी शिक्षकांना स्पष्ट शब्दांत शाळेतील हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असा इशारा दिला.

Jalna News
Jalna News : संभाव्य पाणीटंचाईसाठी साडे सोळा कोटींचा आराखडा

शालेय पोषण आहार योजना, स्वच्छता अभियान व शैक्षणिक सुविधा याबाबत अधिकाऱ्यांनी शिक्षकांशी चर्चा करत सांगितले की, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी योजना फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवल्या गेल्या पाहिजेत. मुख्याध्यापक रामप्रसाद शेळके व सर्व शिक्षकांना तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी दिनेश शिंगणगारे, केंद्रप्रमुख डॉ. विजय पंजरकर, झांबरे, यांच्यासह सरपंच अॅड. रतन तार्डे उपस्थित होते.

सुविधा मिळणार

जामखेड जि.प. प्रशालेस अधिकाऱ्यांच्या या अचानक भेटीमुळे शाळेतील त्रुटींवर तातडीने कारवाई होऊन सुविधा अधिक सक्षम होतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news