Jalna News : प्रामाणिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत नेहमीच सन्मान

शिवदुर्गा संवाद दौऱ्यानिमित्त खा. ज्योती वाघमारे यांचे प्रतिपादन
Jalna News
Jalna News : प्रामाणिक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत नेहमीच सन्मानfile photo
Published on
Updated on

Jalna News: Honest workers are always respected in the Shiv Sena

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवदुर्गा संवाद दौऱ्यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मतदारसंघातील विविध गावांतील महिला मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहिल्या होत्या.

Jalna News
Municipal elections | विकासाला कौल

मेळाव्यात मार्गदर्शन करताना खा. ज्योतीताई वाघमारे यांनी शिवसेनेतील कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या संधींचा उल्लेख केला. "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील मुलीला खासदार होण्याची संधी दिली. शिवसेनेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान केला जातो. मेहनत, निष्ठा आणि जनसेवेच्या बळावर कोणताही कार्यकर्ता मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकतो," असे त्या म्हणाल्या.

घनसावंगी मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेताना त्यांनी आ. हिकमत उढाण यांच्या कार्याचे कौतुक केले. मतदारसंघात विकासाचा नवा अध्याय सुरू झाला असून विविध विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सामाजिक व रुग्णसेवा क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या मायाताई उढाण यांच्या कार्याचाही गौरव केला. मान्यवरानी मार्गदर्शन केले.

यावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या कलाताई शिंदे, संगीताताई ठोंबरे, विजयाताई पोटे, प्रीतीताई बंड तसेच मायाताई उढाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

Jalna News
kolhapur | गुंठेवारीतून तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणे नियमित करण्याचा डाव

योजनांचा लाभ घ्यावा

यावेळी आ. हिकमत उढाण म्हणाले की, महिलानी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा तसेच समाजकारण, विकासकामे आणि लोकहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news