Jalna News : महापालिकेची निवडणूक निर्भय होण्यासाठी प्रयत्न

जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल : माध्यमांशी साधला संवाद
Jalna News
Jalna News : महापालिकेची निवडणूक निर्भय होण्यासाठी प्रयत्न File Photo
Published on
Updated on

Jalna News: Efforts being made to ensure the municipal election is conducted without fear.

जालना, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेची निवडणूक निर्भय आणि निरपेक्ष वातावरणात व्हावी. यासाठी आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही याकडे कटाक्षाने पाहिल्या जात आहे. निवडणुका निर्भय होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, असे मत जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त आशिमा मित्तल यांनी व्यक्त केले. शुक्रवार, दि. २ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांशी त्या बोलत होत्या.

Jalna News
Gutkha Seized : आतापर्यंत ७१ लाखांचा गुटखा जप्त

यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, की शहरातील एकूण २९१ मतदान केंद्रांवर अॅश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी अंतर्गत पाणी, वीज, रॅम्प आणि स्वच्छतागृहे यांसारख्या सोयीसुविधा तातडीने पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व मतदान केंद्रांवर सुरक्षा आणि पारदर्शकतेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रक्रियेची गती वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांचे दुसरे महत्वाचे प्रशिक्षण ३ जा-नेवारी २०२६ रोजी सेंट मेरी हायस्कूल येथे पार पडेल. याव्यतिरिक्त, मतमोजणीबाबतचे पहिले प्रशिक्षण ७ जानेवारीला तर दुसरे प्रशिक्षण १२ जानेवारीला आयोजित करण्यात आले आहे. मतदान यंत्रांबाबत ७ जानेवारी रोजी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रभाग क्र. १ ते १६ पर्यंतच्या सर्व मतदान यंत्रांचे कमिशनिंग ८ जा नेवारी रोजी दोन स्वतंत्र सत्रांत पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान, त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप क्रमांतर्गत व्यापक मोहिमेच्या नियोजनाबदद्दल माहिती दिली.

Jalna News
Jalna News : ऊसतोड मजुरांची दीडशे मुले पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात

सार्वजनिक ठिकाणी बॅनर, पोस्टर्स आणि होर्डिंग्ज लावणे. घंटागाडी आणि रिक्षांद्वारे प्रभागनिहाय ध्वनिक्षेपकावरून जनजागृती शालेय विद्यार्थ्यांमार्फत पालकांना पत्रलेखन आणि स्वाक्षरी मोहीम, सेल्फी पॉइंट, रांगोळी स्पर्धा, सोशल मीडिया प्रचार आणि मॅस्कॉटची (शुभंकर) नियुक्ती. आदींची माहिती त्यांनी यावेळी दिली. दि. ३ रोजी निवडणूक लढविणाऱ्या वैध उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आठ ठिकाणी एसएसटी पथक

महानगरपालिकेची निवडणूक निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली. आठ एसएसटी पथके तैनात करण्यात आली आहे. मंठा चौफुली डिमार्ट जवळ, रोहनवाडी चौफुली, अंबड चौफुली, छत्रपती संभाजीनगर चौफुली, निधोना चौफुली, भोकरदन रोड खंडेलवाल पेट्रोलपंपाजवळ, सिंदखेड राजा रोड दत्त आश्रम आदी ठिकणी ही पथके आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news