Amrut-2 scheme : अमृत-२ योजनेतून बदनापूरला लवकरच मिळणार फिल्टर पाणी

सोमठाण्याहून पाणीपुरवठा; चार जलकुंभांचे काम पूर्ण, कामाची पाहणी
Amrut-2 scheme
Amrut-2 scheme : अमृत-२ योजनेतून बदनापूरला लवकरच मिळणार फिल्टर पाणीfile photo
Published on: 
Updated on: 

Jalna News: Badnapur to soon receive filtered water under the Amrut-2 scheme

बदनापूर, पुढारी वृत्तसेवा : अमृत-२ योजनेअंतर्गत बदनापूर शहरासाठी सुरू असलेल्या फिल्टर पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सोमठाणा येथील अप्पर दुधना तलावातील विहिरीतून पाण्यावर प्रक्रिया करून शहराला फिल्टर पाणीपुरवठा लवकरच सुरू होणार आहे. शहरातील रेल्वे स्टेशन रोड, मार्केट कमिटी, आनंदनगर व एकतानगर या चार ठिकाणी मोठ्या क्षमतेच्या जलकुंभांची उभारणी करण्यात आली आहे.

Amrut-2 scheme
Jalna News : आजपासून जालना शहराचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद

योजनेतर्गत पाइपलाइन तसेच चारही जलकुंभांचे काम पूर्ण झाले असून, सध्या योजनेच्या टेस्टिंगची प्रक्रिया करण्यात येणार आहे. टेस्टिंग यशस्वी झाल्यानंतर शहरातील नागरिकांना नवीन नळ कनेक्शनद्वारे फिल्टर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

दरम्यान, या कामाची आमदार नारायण कुचे, नगराध्यक्ष चित्राताई पवार, मुख्याधिकारी विशाल पाटील व संतोष पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधितांकडून योजनेच्या कामाची माहिती घेण्यात आली. यावेळी अधिकारी यांची उपस्थिती होती.

Amrut-2 scheme
Jalna News : डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप
पाईपलाईनचे टेस्टिंग काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील नागरिकांना नवीन नळ कनेक्शनद्वारे फिल्टर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना नियमित आणि शुद्ध पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे,
चित्राताई पवार, नगराध्यक्षा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news