Jalna Crime : खून प्रकरणातील आरोपी अकरा महिन्यांनंतर जेरबंद

मोटारसायकल चोरीचाही गुन्हा केला उघड, 65 हजारांची दुचाकी जप्त
Jalna murder case
जालना ः खून प्रकरणातील आरोपीस अकरा महिन्यांनंतर जेरबंद करण्यात आले. यावेळी आरोपीसह पोलिस अधिकारी व कर्मचारी. pudhari photo
Published on
Updated on

जालना ः शहरातील सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीस पोलिसांनी अकरा महिन्यांनंतर जेरबंद करण्यात यश मिळवले. यावेळी आरोपीच्या ताब्यातुन 65 हजार रुपये किमतीची दुचाकीही जप्त करण्यात आली.

खून प्रकरणात मागील 11 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करत त्याच्याकडून सुमारे 65 हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली आहे.

शहरातील सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत उमेश इंगळे यांचा खून करण्यात आल्याची घटना 9 मे 2025 रोजी घडली होती. या प्रकरणी फिर्यादी सरला उमेश इंगळे (रा. संजय नगर, जालना) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपी संतोष बंडू भिसे (रा. प्रशांतनगर, जालना) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार होता.

Jalna murder case
Jalna News : जबरी चोरीतील अट्टल आरोपी जेरबंद

दरम्यान, पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथक आरोपीच्या शोधात होते. खबऱ्याने दिलेल्या माहीतीच्या आधारे आरोपी सिंदखेडराजा येथून जालना येथे येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने सुमारे 11 महिन्यांपूर्वी मंठा परिसरातील एका मंगल कार्यालयासमोरून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर मंठा पोलिस ठाण्यातील गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून सुमारे 65 हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली आहे.आरोपीकडुन इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Jalna murder case
Crime News : दुकाने फोडणारा आरोपी जेरबंद

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव व त्यांच्या पथकाने केली.

सक्रियतेची गरज

जालना शहरात मागील काही दिवसांपासून खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुन्हेगार खून केल्यानंतर फरार होताना दिसत आहे. पोलिसांनी अधिक सक्रिय होऊन गुन्हेगारांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news