Jalna encroachment drive : नाले, रस्त्यावरील 19 अतिक्रमणे काढली

पाणीवेस ते राजमहल टॉकीज परिसरात कारवाई
Jalna encroachment drive
जालना ः पाणीवेस ते राजमहेल टॉकीज अतिक्रमण काढण्यात आले. pudhari photo
Published on
Updated on

जालना : शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच पावसाळ्यात नाल्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी जालना शहर महानगरपालिका प्रशासनाने मंगळवारी धडक अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली. पाणीवेस ते राजमहेल टॉकीज परिसरातील मुख्य रस्ता आणि नाल्यांवरील एकूण 19 अतिक्रमणे हटविण्यात आली.

महापालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशानुसार तसेच सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मोहिमेदरम्यान दुकानांसमोरील अनधिकृत ओटे, पायऱ्या, शेड्स हटविण्यात आले. तसेच नाल्यांवरील अतिक्रमण काढून नाले पूर्णपणे मोकळे करण्यात आले.

Jalna encroachment drive
jalna News : शहरातील ४० अतिक्रमणे हटवली

कारवाईसाठी एक जेसीबी, एक टिप्पर तसेच पोलीस पथकाची मदत घेण्यात आली. अतिक्रमण प्रमुख बी. सी. राठोड यांच्या नेतृत्वाखाली शामसन कसबे, अमजद खान, अजय पेम्बर्ती, शेख कादर, आमेर खान यांच्यासह स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला.

Jalna encroachment drive
Chiplun market | चिपळूण बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news