Jalna municipal corporation : सभापती, उपसभापती निवड; वातावरण तापले

आज निर्णयः स्थायीसह विविध समित्यांच्या निकालाकडे उत्सुकता
Jalna municipal committee chairman election
Jalna municipal corporation : सभापती, उपसभापती निवड; वातावरण तापलेpudhari photo
Published on
Updated on

जालना : जालना शहर महानगरपालिकेतील स्थायीसह विविध विषय समित्यांच्या सभापती व उपसभापती निवडीकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मंगळवार (दि.17 ) रोजी विशेष सभेत निवड प्रक्रिया पार पडणार आहे. सध्या जालना महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने या निवडीकडे विशेष उत्सुकतेने पाहिले जात आहे.

दरम्यान, शुक्रवार, दि. 13 रोजी स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच इतर चार विशेष समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांसाठी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आले होते. या प्रक्रियेत सभापती पदासाठी 6 तर उपसभापती पदासाठी 5 असे एकूण 11 नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले आहेत.

Jalna municipal committee chairman election
Sambhajinagar ZP president election : दोन्ही शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत

प्राप्त नामनिर्देशनांनंतर आता मंगळवार दि. 17 रोजी होणाऱ्या विशेष सभेत संबंधित पदांसाठी यांचे नामनिर्देशन दाखल करण्यात आले. नामनिर्देशन पात्रांची छाननी होणार आहे. मतदान व निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडीतून मनपाच्या विविध समित्यांचे नेतृत्व निश्चित होणार असून आगामी वर्षभरातील कामकाजावर त्याचा प्रभाव पडणार आहे.

शहरातील विकासकामे, महिला-बालकल्याणाशी संबंधित उपक्रम तसेच विविध प्रशासकीय निर्णयांमध्ये समित्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. जालना महानगरपालिकेत सध्या भाजपचे बहुमत असल्याने समिती सभापती व उपसभापती पदांवर कोणाला संधी मिळते, याबाबत पक्षांतर्गत चर्चांना वेग आला आहे.

Jalna municipal committee chairman election
Hotel inspection LPG raid : तपासणीत हॉटेल ३८ गॅस सिलिंडर जप्त

इच्छुक नगरसेवकांकडूनही या पदांसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे उद्याच्या निवड प्रक्रियेत कोणाच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नगरसचिव विभागाने सर्व सदस्यांना विशेष सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून निवड प्रक्रिया नियमानुसार पार पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निवडीनंतर मनपातील विविध समित्यांच्या कामकाजाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थायी समिती ही महत्वाची समिती आहे. या समितीकडे महापालिकेची आर्थिक चावी असते.

भाजपाकडून अर्ज दाखल केलेले उमेदवार

महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी अशोक उर्फ लक्ष्मीकांत मनोहर पांगारकर, महिला व बालकल्याण सभापती पदाकरिता सौ.संध्या संजय देठे, उपसभापती पदाकरिता सौ.पद्मा अजित मानधनी, स्वच्छता व आरोग्य समिती सभापती पदासाठी कपिल श्रावण भूरेवाल व उपसभापती पदासाठी सौ.अनामिका विजय पांगारकर, बांधकाम समिती सभापती माया मनोज जोशी व उपसभापती पदाकरिता ऐश्वर्या आडेकर शिक्षण व विद्युत सभापती पदासाठी सौ. भाग्यश्री जोगस व उपसभापती पदासाठी कार्तिकी इंगळे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती पदाकरिता सौ. पूनम राजेश स्वामी व उपसभापती पदासाठी सौ. अनिता मोहन खोडवे.

स्थायी समितीचे प्रमुख कार्ये

  • महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर (बजेट) चर्चा करून मंजुरी देणे

  • महसूल व खर्चावर नियंत्रण ठेवणे.

  • विविध विभागांच्या आर्थिक प्रस्तावांना मंजुरी देणे.

  • विकासकामांच्या निविदा (टेंडर) मंजूर करणे.

  • महानगरपालिकेच्या मालमत्ता व निधीचे व्यवस्थापन करणे.

  • आर्थिक नियम व धोरणांची अंमलबजावणी पाहणे.

  • महापालिकेच्या कामकाजावर नियंत्रण व देखरेख ठेवणे. आवश्यक असल्यास तत्काळ आर्थिक निर्णय घेणे.

  • विविध समित्यांकडून आलेल्या प्रस्तावांचा आढावा घेणे.

  • प्रशासनाच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन व निर्णय देणे.

पक्षीय बलाबल

भाजप 41

शिवसेना शिंदे गट 12

काँग्रेस 9

एमआयएम 2

अपक्ष 1

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news