Hotel inspection LPG raid : तपासणीत हॉटेल ३८ गॅस सिलिंडर जप्त

कन्नड, गंगापूर, सिल्लोडमध्ये कारवाई
Hotel inspection LPG raid
पुरवठा विभागाच्या पथकाने गंगापूर येथे जप्त केलेले गॅस सिलिंडर.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : युद्धजन्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात गॅस सिलिंडरच्या तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरवठा विभागाकडून हॉटेलांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत सोमवारी कन्नड, गंगापूर आणि सिल्लोड तालुक्यात २३ हॉटेलांमधून घरगुती वापराचे ३८ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आली.

संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. गॅस सिलिंडरचा काळाबाजार, साठेबाजी आणि गैरवापर थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या आदेशानुसार आधी गॅस एजन्सींच्या गोदामांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर आता हॉटेलांमधील गॅस सिलिंडरही तपासण्यात येत आहे.

Hotel inspection LPG raid
Sambhajinagar Crime: आधी प्राधापकाची हत्या, मग आरोपीचा पोलीस ठाण्यातच वावर; संभाजीनगर पोलिसांच्या निष्काळजीपणा उघड

कुठे किती सिलिंडर जप्त

कन्नड -२० सिलिंडर

गंगापूर -१४ सिलिंडर

सिल्लोड -४ सिलिंडर

Hotel inspection LPG raid
Chatrapati Sambhajinagar : युद्धामुळे खाद्यतेलाच्या दरात १६ ते २० रुपयांची वाढ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news