Sambhajinagar ZP president election : दोन्ही शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत

जि. प. अध्यक्षपद निवडणूक : शिंदे-ठाकरे सेनेचे सदस्य एकत्रित सहलीवर
Sambhajinagar ZP president election
Sambhajinagar ZP president election : दोन्ही शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीतFile Photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण आकार घेत असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या सत्तेच्या गणिताला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या शिंदे आणि ठाकरे सेनेचे उमेदवार एकत्रित सहलीवर गेल्याची माहिती आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने २३ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. तर शिवसे-नेने २१ जागांवर विजय मिळवत दुसरे स्थान पटकावले आहे. जागांमधील फरक अत्यल्प असल्याने अध्यक्षपदासाठी दोन्हीकडून तीव्र राजकीय हालचाली सुरू आहेत. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही शिवसेनेकडून आपले जिल्हा परिषद सदस्य सध्या सहलीवर पाठविण्यात आले आहेत.

Sambhajinagar ZP president election
illegal tape in auto rickshaw : रिक्षात वाढता टेपचा दणदणाट : प्रवासी हैराण

फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः अध्यक्षपदासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचाही विचार दोन्ही गटांकडून केला जात असल्याची चर्चा आहे.

भाजपकडूनही जोरदार मोर्चेबांधणी

अध्यक्षपदाच्या निवडीची वेळ जवळ येत असताना भाजपकडूनही जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र दोन्ही शिवसेनेचे समीकरण जुळल्यास जिल्हा परिषद सत्तेचे गणित पूर्णपणे बदलण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Sambhajinagar ZP president election
Chatrapati Sambhajinagar : काँक्रीट रस्त्यांनी वाढविले शहराचे 2 सेल्सिअस तापमान

२०१७ च्या पुनरावृत्तीची शक्यता !

दरम्यान, २०१७ च्या जिल्हा परिषद सत्तास्थापनेची आठवण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यावेळी भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही सत्ता स्थापन करू शकला नव्हता. तत्कालीन काँग्रेसमधील अब्दुल सत्तार यांनी शिव-सेना-काँग्रेस युती घडवून आणत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले होते. त्यामुळे यावेळीही तशीच राजकीय परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news