Jalna Crime : गुन्हेगारांना चपराक; नूतन वसाहत भागात आरोपींची काढली धिंड

पोलिस ‌‘ॲक्शन‌’ मोडमध्ये ; ‌‘आम्ही गुन्हेगार आहोत‌’ कबुली देत परिसरात फिरवले
Jalna knife attack case
जालना ः काँग्रेस सेवा दलाच्या जिल्हाध्यक्षांवर करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यातील आरोपींची कदीम जालना पोलिसांनी गुरुवार, दि. 2 रोजी सायंकाळी अशा प्रकारे धिंड काढण्यात आली.pudhari photo
Published on
Updated on

जालना ः जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुंडांविरोधात कदीम जालना पोलिसांनी गुरुवारी (दि. 2) सायंकाळी धडाकेबाज कारवाई करत भर रस्त्यावरून त्यांची धिंड काढली. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

आठ दिवसांपूर्वी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष शेख इब्राहिम यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला झाला होता. या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत मुख्य आरोपी मुन्ना बशीर खान व बबलू बशीर खान यांना अटक केली.

Jalna knife attack case
MD drugs seizure : मसनतपूर भागात एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

अटकेनंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना नूतन वसाहत परिसरातून भर रस्त्यवरून फिरवले. ज्या भागात त्यांनी दहशत निर्माण केली होती, त्याच रस्त्यावर त्यांना हातांता बेड्या घालून फिरवण्यात आले. यावेळी आरोपींनी “आम्ही गुन्हेगार आहोत” अशी कबुली दिल्याचे पाहायला मिळाले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Jalna knife attack case
Jalna News : जबरी चोरीतील अट्टल आरोपी जेरबंद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news