Jalna Grant Scam : अनुदान घोटाळा, गुन्हे दाखल होणार

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले कारवाईचे संकेत
Jalna Grant Scam
Jalna Grant Scam : अनुदान घोटाळा, गुन्हे दाखल होणार(File Photo)
Published on
Updated on

Jalna Grant scam, crimes will be registered

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीपोटी आलेल्या अनुदानात ३५ कोटींचा घोटाळा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहेत.

Jalna Grant Scam
Jalna Agriculture News : कपाशीवर कोकडा रोगांचा प्रादुर्भाव

याबाबत मंगळवारी दि. ८ रोजी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सदस्यांनी या घोटाळ्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना त्यांनी या घोटाळ्याची विभागीय चौकशी सुरू असून, दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेला जालना जिल्ह्यातील अनुदान घोटाळ्यातील दोषी असलेल्या तहसीलदारांसह ५७कर्मचाऱ्यांवर लवकरच फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. याबाबत मंगळवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी याप्रकरणी कारवाईचे संकेत दिले.

Jalna Grant Scam
Jalna News : हेमाडपंती शिवमंदिराची दुरवस्था, काही भाग ढासळण्याच्या मार्गावर

जालना जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी, गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसाभरपाईपोटी शासनाकडून जिल्ह्यात १ हजार ५५० कोटींचे अनुदान प्राप्त झाले होते. मात्र, या अनुदान वाटपात तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांनी तहसीलदारांच्या लॉगिन आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून तब्बल ३४ कोटी ९७ लाखांचा घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले होते.

घोटाळ्यातील ५७ जणं रडारवर

जिल्हाधिकाऱ्यांनी या घोटाळ्यातील २१ तलाठी, लिपिकांना निलंबित केले आहे. उर्वरित २० कृषी सहायक, ३८ ग्रामसेवक आणि नायब तहसीलदार, सहा तहसीलदारांवर विभागीय कारवाई प्रस्तावित केलेली आहे. या घोटाळ्यात दोषी आढळून आलेल्या ५७ जणांवर कारवाई कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news