Marigold Price Crash : पाण्याचा दुष्काळ; दसऱ्याला झेंडूचे दर कोसळले!

२० ते ३० रुपये किलोने झेंडूच्या फुलांची विक्री; शेतकऱ्यांच्या पदरी निराशा
Marigold Price Crash
पांगरी : जालना- मंठा हायवेवरील वाटुरफाटा येथे मंगळवारी दसरा सणाच्या निमित्ताने झेंडूचा बाजार फुलला होता. दुष्काळ असतानाही झेंडूचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडल्याचे पहावयास मिळाले. ३० ते ४० रुपये किलोने झेंडूची विक्री झाली (छाया : संजय खंदारे)
Published on: 
Updated on: 

जालना : जिल्ह्यात एकीकडे भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असताना दुसरीकडे दसरा सणाच्या दिवशी झेंडूच्या फुलांचे दर कोसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने फुलांची लागवड केली होती. मात्र, बाजारात फुलांची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली. परिणामी, २० ते ३० रुपये प्रतिकिलो दराने झेंडूची फुले विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यामुळे उत्पादनासाठी केलेला खर्चही भरून निघणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

जालना जिल्ह्यात यंदा पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याची उपलब्धता कमी असल्याने शेती करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. अशा परिस्थितीतही काही शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून झेंडूच्या फुलांची लागवड केली. दसरा आणि इतर सणांच्या काळात फुलांना चांगली मागणी असते. त्यामुळे या कालावधीत समाधानकारक दर मिळून आर्थिक हातभार लागेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती.

Marigold Price Crash
Ashoka Vijayadashami 2026 : बुद्धलेणी धम्मभूमीवर भीमसैनिकांचा जनसागर

विकतच्या पाण्यावर फुलवली बाग

पाण्याची टंचाई असल्याने अनेक शेतकऱ्यांना झेंडूची बाग जगवण्यासाठी विकतचे पाणी आणावे लागले. पाणी, खते, औषधे, मजुरी आणि वाहतुकीवर खर्च करून शेतकऱ्यांनी फुलांचे उत्पादन घेतले. मर्यादित पाण्यात पीक टिकवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागली. दसऱ्याच्या सणात फुलांची मागणी वाढेल आणि चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने फुलांची तोडणी केली.

मात्र, दसऱ्याच्या दिवशी बाजारात झेंडूच्या फुलांची आवक वाढल्याने अपेक्षेच्या उलट परिस्थिती निर्माण झाली. मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढल्याने फुलांचे दर घसरले. त्यामुळे शेतकऱ्यांना २० ते ३० रुपये प्रतिकिलो दराने फुले विकावी लागली. मेहनत, पाणी आणि उत्पादनासाठी केलेला खर्च लक्षात घेता हा दर अत्यंत कमी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.दिवाळी पर्यंत झेंडुच्या भावात घसघसीत वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Marigold Price Crash
Chhatrapati Sambhajinagar Crime : संभाजीनगरात रॉडने डोके फोडून मित्राची निर्घृण हत्या

खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी

दुष्काळामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना झेंडूच्या दरातील घसरणीचा मोठा फटका बसला आहे. सणासुदीच्या काळात चांगले उत्पन्न मिळण्याची आशा होती. मात्र दर कोसळल्याने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. पाण्याची टंचाई आणि बाजारातील दरातील अनिश्चितता यामुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांसमोरील अडचणी अधिकच वाढल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news