Chhatrapati Sambhajinagar Crime : संभाजीनगरात रॉडने डोके फोडून मित्राची निर्घृण हत्या

गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : नवरात्रोत्सवात दांडिया खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका २० वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्राने किरकोळ शिवीगाळीच्या कारणावरून लोखंडी रॉडने डोक्यात व मानेवर सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा थरार मुकुंदवाडी परिसरातील संघर्षनगर भागात मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास घडला. गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पुष्कर सतीष गाडे (२०, रा. संघर्षनगर, गल्ली नं. २, नालंदा बौद्ध विहाराजवळ, मुकुंदवाडी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून, तो एका नामांकित कपड्याच्या दुकानात कामाला होता. याप्रकरणी त्याचा मित्र महेश संजय पवार ऊर्फ भोऱ्या (२३, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) खुनाचा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनवाल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.

Crime News
Pankaja Munde | मला अंतरवालीत प्रेमाचा प्रसार करायचाय : पंकजा मुंडे

फिर्यादीनुसार, पुष्करचे वडील सतीष गाडे हे स्वतःचा छोटा टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी (दि. १९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते टेम्पो घेऊन घरी आले. त्यांनी मुलगा पुष्करकडे चावी देऊन गाडी घराजवळ पार्क करण्यास सांगितली. गाडी उभी केल्यानंतर पुष्करने वडिलांकडे दांडियासाठी २०० रुपये मागितले. रात्र उलटून गेली तरी पुष्कर घरी परतला नाही, त्यामुळे चिंतेत पडलेल्या आईने मध्यरात्री १.१५ वाजेच्या सुमारास पुष्करचा मित्र महेश पवार ऊर्फ भोऱ्या याच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी महेशने, पुष्कर माझी गाडी घेऊन गेला आहे, तो आला की आम्ही दोघे सोबत घरी येतो, असे सांगून वेळ मारून नेली.

Crime News
Gulabrao Patil: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील; गुलाबराव पाटलांचा दावा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news