Jalna Brother Killed |लहान भावाकडून मोठ्या भावाचा खून, झोपेत असताना कुऱ्हाडीने वार

Younger brother kills elder brother in Jalna- घुंगर्डे हादगाव : संशयित भावाला पोलिसांनी घेतले ताब्यात
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

अंबड पुढारी वृत्तसेवा: अंबड तालुक्यातील घुंगरडे हादगाव येथे लहान भावाने मोठ्या भावाचा झोपेतच कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना सोमवारी (दि. २६) मध्यरात्री घडली. मंगळवारी (दि. २७) सकाळी सहाच्या सुमारास सदर प्रकार उघडकीस आला. तुकाराम जगन्नाथ काकडे (वय २४) असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी त्याचा लहान भाऊ रामेश्वर जगन्नाथ काकडे (वय २२) याला गोंदी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

खुनाच्या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल गुरले हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर कुटुंबीयांकडे चौकशी सुरू केली. या चौकशी दरम्यान पोलिसांचा संशय रामेश्वरवर बळावला त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने मोठ्या भावाचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

Crime News
jalna minor girl assault|अल्पवयीन बालिकेवर ३० वर्षीय युवकाचे कुकर्म

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तुकाराम हा दारू पिऊन आई-वडील आणि लहान भावाला सतत त्रास देत असे. त्यांच्याशी मारहाणही करीत असल्याचे सांगण्यात येते. या सततच्या त्रासातून हा खून झाल्याचे चौकशीदरम्यान समोर आल्याची माहिती आहे. मात्र, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

काकडे कुटुंबीयांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. गावालगत असलेल्या शेतातील घरात तुकाराम त्याच्या पत्नीसह राहत होता. तर गावातील घरात आई-वडील आणि लहान भाऊ रामेश्वर राहत होता. शेतीच्या कामानिमित्त रामेश्वर अधूनमधून शेतातील घरात मुक्कामाला जात असे. सोमवारी मध्यरात्री शेतातील घरात तुकाराम झोपलेला असताना त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.

मंगळवारी सकाळी घटनेची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. मृत तुकारामचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, सहायक पोलिस निरीक्षक अमोल गुरले यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलिस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

आरोपी जेरबंद

तुकाराम जगन काकडे याच्या खूनप्रकरणी गोंदीचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अमोल गुरले, पोलिस उपनिरीक्षक संतोष मुपडे, पोलिस उपनिरीक्षक किरण हावले यांनी तपासाची चक्रे फिरवून रामेश्वर जगन काकडे या मयताच्या लहान भावास जेरबंद केले. सदरची कार्यवाही गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल गुरले, पोलिस उपनिरीक्षक संतोष मुपडे, पोलिस उपनिरीक्षक किरण हावले, पोलिस अंमलदार बालाजी पदमाने अंमलदार हावले, सिद्दीकी, भोजने, भवरे व खरात यांनी केली.

Crime News
Jalna-पावसाचा खंड जिल्ह्यातील फळबागांच्या मुळावर !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news