jalna minor girl assault|अल्पवयीन बालिकेवर ३० वर्षीय युवकाचे कुकर्म

आरोपीविरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल
minor girl
Minor girl file photo
Published on: 
Updated on: 

टेंभुर्णी : पोलिस ठाणे टेंभुर्णी हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो अॅक्ट) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून, गावातील संशयित आरोपी अक्षय रविंद्र शिंगणे (वय ३० वर्ष) याने तिच्या मनाविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केले. या अत्याचारातून पीडित बालिका गर्भवती राहिली. पीडितेस प्रकृती उपचारासाठी अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केले असता तिची प्रसूती झाली. या संदर्भात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून टेंभुर्णी पोलिस ठाण्यात कलम बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

minor girl
Jalna-पावसाचा खंड जिल्ह्यातील फळबागांच्या मुळावर !

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ तपास हाती घेण्यात आला आहे. पीडिता व नवजात बाळावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू असून, फॉरेन्सिक पुराव्यांची शास्त्रोक्त तपासणी, साक्षीदारांचे जबाब व आरोपीविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बी. एस. खर्डे करत आहेत.

minor girl
Jalna Rain News : आन्वा परिसरात पावसाचा पन्नास दिवसांचा खंड; पिके गेली कोमात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news