Jalna Crime News : सोशल मीडियावर शस्त्रांचे रील्स

नूतन वसाहत भागातील मच्छी मार्केटमधून सराईत गुन्हेगारास कदीम जालना पोलिसांनी पकडले
Jalna Crime News
Jalna Crime News : सोशल मीडियावर शस्त्रांचे रील्सfile photo
Published on
Updated on

Jalna Crime News: Reels of weapons on social media

जालना, पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर धारदार शस्त्रांसह रील्स बनवून दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारास कदीम जालना पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून पोलिसांनी दोन तलवारी, एक कोयता आणि गुन्ह्यात वापरलेला मोबाईल असा १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Jalna Crime News
Beed Crime : आष्टीत ‘धूम स्टाईल’ सोनसाखळी चोरांचा पर्दाफाश; दोन सख्खे मेहुणे गजाआड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी दुपारी कदीम जालना पोलीस ठाण्याचे पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की, सोशल मीडियावर धारदार शस्त्रांसह रील्स बनवणारा एक युवक जुना जालन्यातील नुतन वसाहत भागातील मच्छी मार्केट येथे तलवार घेऊन फिरत आहे.

पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत संशयीताने त्याचे नाव विशाल ऊर्फ रफया संतोष टाकळकर (रा. नूतन वसाहत, जुना जालना) असे सांगितले. संशयीताच्या अंग झडती दरम्यान त्याच्याकडून दोन धारदार तलवारी व एक कोयता जप्त करण्यात आला.

Jalna Crime News
Nanded Crime : देहविक्री रॅकेटचा मोठा भांडाफोड; ट्रॅव्हल्स–लॉज कनेक्शनचा संशय गडद

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

आरोपीविरुध्द विविध गुन्हे

पकडण्यात आलेल्या आरोपी विरुध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात लूटमारीसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो काही प्रकरणांमध्ये फरार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news