

शहागड : राष्ट्रीय महामार्ग 52 वर डिझेल चोरणाऱ्या टोळीचा गोंदी पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला रविवार पाहाटे हॉटेल चौधरी समोरील मोकळ्या जागेत तीन आरोपी हे डिझेल चोरी करण्यासाठी वाहनांची तपासणी करत हाेते. याची गुप्त माहिती गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना मिळतच रास्त गस्तीवर असलेले जमादार रामदास केंद्रे, पो.का.प्रदिप हवाले, शाकेर सिद्दिकी, चालक एस.बी.साठे यांना मिळाली
या माहितीच्या आधारे अजय गुलाब पवार, संकेत जाधव , दत्ता शामगीर नरुके सर्व रा.अंबड हे धाब्यावर उभ्या राहणाऱ्या ट्रकमधील डिझेल चोरी करण्यासाठी आलेले होते. आरोपी हे राष्ट्रीय महामार्ग 52 परिसरात एस. एस चौधरी ढाब्यासमोर उभ्या असलेल्या ट्रकमधील डिझेलची चोरी करत असतांना पोलिसांची चाहूल लागल्याने पळून जाऊ लागले.
पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला यातील एकाने ट्रक चालकास चाकूने मारण्याचा प्रयत्न करत धाक निर्माण केला. आरोपी अजय गुलाब पवार यास अटक करत त्यांच्या ताब्यातून दोन मोटरसायकल, एक चाकू, दोन 35 लिटरच्या प्लास्टिक कॅन असा एकूण दिडलाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरार आरोपींचा दोन आरोपींचा पोलिस पथकामार्फत शोध चालू असून एक आरोपीस अटक करत गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.