

MAVIM associates learn the ropes of toxin-free nutrition gardens
जालना, पुढारी वृत्तसेवाः महिला आर्थिक विकास महामंडळातील २४ सहयोगिनी आणि उपजीविका सल्लागार यांनी खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात दोन दिवस विषमुक्त पोषण बागेचे धडे गिरविले. यातून परस पोषण बाग निर्मिती केली जाणार असून, याचा फायदा परिवारासह परिसरातील अंगणवाड्यांना देखील होणार आहे.
दरम्यान, 'पोषण बाग लागवड तंत्रज्ञान' या विषयावर दि. १९-२० दरम्यान दोन दिवशीय प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात महिलांना डॉ. संगीता कहऱ्हाळे, प्रा. बी. वाय. कुलकर्णी, कृषि विज्ञान केंद्राचे मृद शास्त्रज्ञ प्रा राहुल चौधरी, निवृत्त कृषी अधिकारी एन. एस. पुंड, प्रा. सुनिल कळम, डॉ. एस. व्ही. सोनुने आर्दीनी भाजीपाला लागवड, शेंद्रीय पध्दत, किड व्यवस्थापन आदी विषयी मार्गदर्शन केले-
पोषण बागेची क्षेत्र भेट
डॉ. संगीता कन्हाळे यांनी महिलांना केविके प्रक्षेत्रावरील पोषण बाग दाखवून एका कुटुंबाला लागणाऱ्या एक गुंठा जागेत कशा पद्धतीने भाजीपाला लागवड करता येइल याविषयी माहिती दिली. पोषण बाग मधून लागणाऱ्या सर्व भाज्यांची पूर्तता होते. ताजा व पाहिजे तो भाजीपाला खाण्यास मिळतो. भाज्यावरील खर्च कमी होतो. सर्व प्रकारच्या भाज्या खाल्यामुळे आरोग्य चांगले राहते व दवाखान्यातला खर्च कमी होतो. जास्तीचा पिकवलेल्या भाज्या विकून पैसेही मिळवता येतात.
कुपोषणमुक्तीसाठी पोषण बाग
डॉ. सोनुने यांनी महिला आणि बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी ग्रामीण महिलांनी आपल्याला दैनंदिन लागणारा भाजीपाला आपल्याच पोषण बागेतून तयार करावा व त्यावरील होणारा खर्च कमी करून पौष्टिक भाजीपाला मिळवावा, असे आवाहन केले.
आपापल्या कार्यक्षेत्रात पोषण बाग तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार करावा, असे सांगितले. याप्रसंगी दोन प्रशिक्षनार्थिनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व महिलांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या प्रशिक्षणात