

Badnapur Sakal Maratha Samaj Rasta Roko
बदनापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बदनापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि. ११) जालना–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेऊन मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनाला माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. रास्तारोकोमुळे काही काळ जालना–छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठी वाहतूक कोंडी झाली होती.