Jalna Anganwadi Workers Protest : आशा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर ठिय्या

किमान वेतनासह शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची मागणी
Jalna Anganwadi Workers Protest
जालनाः आशा सेविका, गटप्रवर्तक आणि अंगणवाडी सेविकांनी अशा प्रकारे जिल्हा परिषदेवर ठिय्या मांडला. pudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना : आशा सेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयटकच्या वतीने मंगळवार, दि. २७ रोजी जालना जिल्हा परिषदेवर संयुक्त मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील शेकडो महिला कर्मचारी या मोर्चात सहभागी झाल्या. थकीत मानधन तातडीने द्यावे, दिवाळीपूर्वी मानधन जमा करावे, भाऊबीज भेट द्यावी आणि मानधनात वाढ करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आरोग्य, महिला व बालविकास आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या या कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत असल्याचा मुद्दा आंदोलकांनी उपस्थित केला. त्यांना किमान वेतन लागू करावे, सामाजिक सुरक्षा द्यावी आणि शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

Jalna Anganwadi Workers Protest
Jalna APMC Market Rates : गवार तेजीत, तर लसूण-अद्रकला उच्चांकी दर

मोर्चानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकारी, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि सेवाविषयक प्रश्नांची शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

या मोर्चात देविदास जिगे, गोविंद आर्दड, सुभाष मोहिते, मीना भोसले, कल्पना आर्दड, सरस्वती इंगोले, सुनीता लोळगे, शांता निर्मळ, अनुराधा साठे, वर्षा पाईकराव, पूनम पवार यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या.

Jalna Anganwadi Workers Protest
Sambhajinagar Public Handpump Survey : मनपाकडून शहरातील हातपंपांच्या सर्वेक्षणाला सुरुवात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news