Jalna APMC Market Rates : गवार तेजीत, तर लसूण-अद्रकला उच्चांकी दर

बाजार समितीत फळ बाजारात सफरचंद, डाळिंब आणि सीताफळांची जोरदार आवक
Vegetables
VegetablesFile Photo
Published on: 
Updated on: 

जालना: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे आणि भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाली. बाजारात झालेल्या शेतमालाच्या खरेदी-विक्रीतून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, काही विशिष्ट पिकांना उच्चांकी दर मिळाल्याचे दिसून येत आहे. गवारचे दर तेजीत असून कमाल दर ७,००० रुपये (सरासरी ४,००० रु.) पर्यंत पोहोचले आहेत. तर अद्रकचा कमाल दर १२,५०० रुपये तर लसणाचा कमाल दर तब्बल १३,८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेला आहे.

आजच्या फळ बाजाराच्या आकडेवारीनुसार, सफरचंद ४७ कॅरेट्सची आवक झाली असून कमाल दर २,८०० रुपये, तर किमान दर ४०० रुपये नोंदवला गेला. डाळिंबची आवक २६ कॅरेट्स, कमाल दर तब्बल ३,००० रुपये आणि किमान ५०० रुपये. बाजारात सीताफळांची आवक सर्वाधिक म्हणजेच १६३ कॅरेट्स झाली असून, कमाल दर १,३०० रुपये मिळाला. ड्रॅगन फ्रूटची आवक ५९ कॅरेट्स असून कमाल दर १,८०० रुपये राहिला.

Vegetables
Maharashtra Government Employees Promotion : जिल्हा परिषद लिपिकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

बाजार समितीत फळ आणि भाजीपाला मिळून लाखो रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीच्या सचिव कार्यालयाकडून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची प्रतवारी करूनच बाजारात आणावा, असे आवाहनही यादरम्यान करण्यात आले आहे.

Vegetables
Harsul Lake Water Level : हर्सूल तलाव तळ गाठण्याच्या मार्गावर

कांदा ५ हजार रुपयावर

कांद्याची आवक ३८.२ क्विंटल असून कमाल दर ५,००० रुपये (सरासरी ३,५०० रु.) मिळाला आहे. टोमॅटोचा कमाल दर ३,००० रुपये तर हिरवी मिरचीचा कमाल दर ४,००० रुपये नोंदवला गेला आहे.

पालेभाज्यांची स्थिती

पालेभाज्यांच्या विभागात कोथिंबीर आणि मेथीची आवक बऱ्यापैकी झाली असून कोथिंबीरची १५५० जुड्यांची आवक होऊन कमाल दर ७०० रुपये (शेपटी/जुडी प्रमाणे) मिळाला आहे, तर मेथीच्या १७७६ जुड्यांची आवक होऊन कमाल दर ५०० रुपये राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news