Jalna Wall Collapse | अंबड तालुक्यात घराची भिंत कोसळून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

घुंगर्डे हादगाव येथे शोककळा
Ambad Taluka Two Minor Children Killed
डीक घराची भिंत कोसळून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झालाPudhari
Published on
Updated on

Ambad Taluka Two Minor Children Killed

शहागड : अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे शुक्रवारी (दि.२९) दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत पडीक घराची भिंत कोसळून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत मुलांमध्ये शौर्य गोरख कासार (रा. हादगाव) आणि चैतन्य राधाकिसन भिसे (वय अंदाजे १२, रा. मारफळा, ता. गेवराई) यांचा समावेश आहे. चैतन्य भिसे हा मामाच्या गावी घुंगर्डे हादगाव येथे आला होता.

Ambad Taluka Two Minor Children Killed
Jalna MIDC Crime : एमआयडीसी परिसरात दोन युवकांकडून धारदार खंजर जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास दोघेही गावालगत असलेल्या एका पडीक घराजवळ खेळत होते. यावेळी अचानक जीर्ण अवस्थेतील भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. या दुर्घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने दोन्ही मुलांना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

Ambad Taluka Two Minor Children Killed
Jalna burglary case : घरफोडी करणारे तीनजण जेरबंद

या घटनेनंतर ग्रामस्थांनी गावातील जीर्ण आणि पडीक इमारतींची तातडीने पाहणी करून धोकादायक बांधकामांवर आवश्यक कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news