Jalna MIDC Crime : एमआयडीसी परिसरात दोन युवकांकडून धारदार खंजर जप्त

चंदनझिरा पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
Jalna MIDC Crime
एमआयडीसी परिसरात दोन युवकांकडून धारदार खंजर जप्तpudhari photo
Published on
Updated on

जालना : शहरातील एमआयडीसी परिसरात अवैधरीत्या धारदार खंजर बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या दोन युवकांना चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या जवळून दोन धारदार खंजर जप्त केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात दोन युवक धारदार शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने परिसरातील स्वराज पार्किंगसमोरील रस्त्यावर सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या जवळून दोन धारदार खंजर आढळून आले.

Jalna MIDC Crime
Jalgaon Crime : सेंधव्याची 'ती' आंतरराज्य टोळी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणी ओमकार शामसुंदर सिंघल (वय 22, रा. संतोषीमाता नगर, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) आणि ओमकार गिरीजाशंकर शेळके (वय 21, रा. धनगर पिंप्री, ता. अंबड, जि. जालना) यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली सपोनि मनसुब वेताळ, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे व रवींद्र देशमुख यांनी केली.

Jalna MIDC Crime
Dombivli murder : डोंबिवलीत नळ चालू ठेवल्याचा जाब विचारल्याने हत्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news