Jalna burglary case : घरफोडी करणारे तीनजण जेरबंद

घरफोडीचे सहा गुन्हे उघड, 1 लाख 19 हजारांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Jalna burglary case
जालना ः जालना शहरात विविध ठिकाणी घरफोडी करणाऱ्या संशयितांना अटक केल्यानंतर आरोपींसह पोलिस. pudhari photo
Published on
Updated on

जालना : जिल्ह्यातील वाढत्या चोरी व घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत तब्बल सहा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत दोन घरफोडी करणारे आरोपी तसेच चोरीचा माल खरेदी करणारा एक आरोपी अशा तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस पथक चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काही दिवसांपूर्वी रंगनाथनगर परिसरात घरफोडी करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना वलीमामु दर्गा परिसरातून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी रंगनाथनगर येथील घरफोडीची कबुली दिली.

Jalna burglary case
Sangli Crime : सांगलीत तीन सराईत चोरटे जेरबंद

तसेच सदर बाजार व तालुका पोलीस ठाण्यातील आणखी पाच गुन्ह्यांचीही कबुली देत चोरीचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुंदरसिंग सुखुसिंग राजपूत (रा. वलीमामु दर्गा जालना), लाजरस शांतीलाल मिसाळ (रा. वलीमामु दर्गा, जालना) आणि मनोज कलाजी धानुरे (वय 30, रा. दर्गावेस, काद्राबाद, जालना) यांचा समावेश आहे.

Jalna burglary case
Malegaon Bike Theft Gang | दुचाकीचोरांची टोळी जेरबंद; 7 दुचाकी जप्त

अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी तसेच उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या यशस्वी कारवाईत सपोनि सचिन खामगळ, पोउपनि राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार रमेश राठोड, गोपाल गोशिक, प्रभाकर वाघ, इरशाद पटेल, संदीप चिंचोले, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, सतीश श्रीवास व कैलास चके यांनी सहभाग घेतला.

विविध गुन्ह्यांचा उलगडा

या कारवाईत तालुका जालना व सदर बाजार पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या विविध घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला. आरोपींकडून रोख रक्कम व मोबाईलसह एकूण 1 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news