Parbhani crime | पूर्णेतील दोन जबरी चो-यातील ५ गुन्हेगार चोरटे जेरबंद;८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पूर्णा पोलीसांची धाडसी कार्यवाही
Parbhani crime
Parbhani crime
Published on
Updated on

पूर्णा : शहरात मागील सहा दिवसांपूर्वी काही अज्ञात चोरट्यांनी वाटमारी करुन प्रवासी नागरिकांना लुटून जबरी चोरी केल्या होत्या. सदर घटना प्रकरणी एका घटनेत माटेगाव येथील आत्माराम बोबडे यांचा मोबाईल हिसकावून घेतला होता. तर दुसऱ्या घटनेत पूर्णा शहरातील अलंकार नगर येथील प्रवाशी नागरीक मनोहर सोपान माघाडे यांची ता १३ मार्च रोजी संध्याकाळी दुचाकी अडवून त्यांना खाली पाडून छातीवर बसून जबर मारहाण करुन जखमी केले अन् त्यांच्याजवळील रोज रक्कम, कार्ड कागदपत्रे, दुचाकी लंपास केली होती.

या घटनेतील दोघांनीही पूर्णा ठाण्यात तक्रार दिली होती.या वरुन पोलीस अधिकाऱ्यांनी तपास सुत्रे वेगाने फिरवली. तद्नंतर तीन दिवसातच पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यातील चोरट्यांचा कसून तपास करत त्यांना शिताफीने पकडून जेरबंद केले. यात, त्यांनी चोरलेल्या ६ दुचाकी,११ मोबाईल हस्तगत करुन जप्त करण्यात आले. पूर्णा पोलिसांनी सदर धाडसी कार्यवाहीत एकूण ८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, सदरील दोन जबरी चो-यातील गुन्हेगार आरोपी आयुष राजेंद्र बरकुंटे, अंकित संजय गायकवाड, श्रिनीवास गाडगे व अन्य अशा पाच जणांना पकडून जेरबंद करण्यात आले आहे. त्यांना विद्यमान न्यायालयात हजर केले असता काही दिवस पोलीस कस्टडी सुनावली होती.

सदरील ही धाडसी पोलीस कारवाई पोअ रविंद्रसिंह परदेशी,अपोअ सुरज गुंजाळ,उपोअ डॉ समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनात पोनि विलास गोबाडे,सपोनि गजानन पाटील,श्रिनिवास पडलवार, प्रकाश ईंगोले, शेख ताजोद्दीन, सुरेश राठोड, रमाकांत तोटेवाड,अजय माळकर, सुरेश चव्हाण, सुधिर काळे, माधव अकलवाड या पथकाने केली.दरम्यान, सदरील चोरी गुन्ह्यातील चोरट्यांना जेरबंद करुन सुमारे साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्यामुळे चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.

पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील १३ ते १६ मार्च दरम्यान दोन जबरी चो-यांचे गुन्हे घडले होते.त्यातील गुन्हेगारांचा कसून तपास घेत ५ चोरटे पकडून जेरबंद केले.त्यांकडील चोरीतील ६ दुचाकी,११ मोबाईल हस्तगत करत जप्त केले आहेत.सदर आरोपीस विद्यमान न्यायालयाने पोलीस कस्टडी सुनावली आहे.त्याच बरोबर रेल्वे स्थानक परिसरात चोरट्यांचा वावर होत आहे का? यावर शोध लावण्यासाठी रेल्वेचे जि आर पी पोलिस आणि लोकल पोलीस कर्मचारी मिळून गोपनीय पद्धतीने तपास सुरु असतो.

तसेच रात्रीच्या वेळी स्थानिक पोलीसांची पेट्रोलियम करण्यात येवून सिव्हिल ड्रेस वरील पोलिस कर्मचारी तैनात करुन त्यांच्याकडूनही चोरटे व गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा शोध घेत कारवाई केली जाते.शिवाय, दुचाकी धारक नागरिकांनी आपली दुचाकी एखाद्या ठिकाणी उभी केली असता तिचे हँडल लॉक करुन घ्यावे, जवळील मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घ्यावी.असे आवाहन उविपोअ डॉ समाधान पाटील यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news