Jalna Accident News : त्या अपघातातील मयत मध्यप्रदेशातील; पुलावर ट्रकचा अपघात होण्याची दुसरी घटना

शहरातील अंबड रोड पुलावरुन पन्नास फुट खाली असलेल्या एकता धाब्यावर ट्रक कोसळुन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले.
jalna accident news
Jalna Accident News : त्या अपघातातील मयत मध्यप्रदेशातील; पुलावर ट्रकचा अपघात होण्याची दुसरी घटनाfile photo
Published on: 
Updated on: 

Jalna Accident News : The deceased in that accident are from Madhya Pradesh; Another incident involving a truck accident on a bridge

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील अंबड रोड पुलावरुन पन्नास फुट खाली असलेल्या एकता धाब्यावर ट्रक कोसळुन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. सदर ट्रक भंगार घेउन वळण रस्त्याने एमआयडीसीकडे जाण्या ऐवजी चुकुन शहरात घुसला असावा असा अंदाज आहे. उड्डाण पुलावर असलेल्या वळणावर ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने सदर अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

jalna accident news
Jalna News : ५०० किलो गोमांसासह १४ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त

जालना शहरातील अंबड रोड उड्डाण पुलावरुन जाणारा अपघाग्रस्त ट्रक हरियाणा राज्यातील हिस्सार येथील असल्याचे सांगण्यात आले. अपघातात जितेंद्र यादव व राम पंकज यादव (रा. छतरपुर, मध्यप्रदेश) असे मयतांची नांवे आहेत.

हरियाणातील हिस्सार येथील कंटेनर (क्र एचआर ३९-ई ७८८६) हा जालना शहरातील एमआयडीसी येथे भंगार घेउन शनिवारी रात्री आला होता. सदर ट्रक वळण रस्त्याने एमआयडीसीकडे जाण्या ऐवजी सरळ शहरात घुसला असावा असा अंदाज आहे. यावेळी अंबड रोडवरील उड्डाण पुलावरुन भरधाव ट्रक जात असतांना ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पुलाचे कठडे तोडुन पन्नास फुटावरुन पुलाखाली असलेल्या एकता धाब्यावर कोसळला.

या अपघातात दोन जण ठार झाले. अपघाताच्या ठिकाणी रविवारी दिवसभर नागरीकांची मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. अपघात कसा झाला याबाबत नागरीकांमधे प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसुन आले.

jalna accident news
Anandacha Shidha : रेशनमधून 'आनंदाचा शिधा' गायब

उपाययोजनेची गरज

अपघातग्रस्त पुलावर यापुर्वीही एका ट्रकने याच ठिकाणी कठड्याला धडक दिली होती. यावेळी सदर ट्रक पुलावरुन खाली पडण्यापासुन वाचला होता.या पुलाच्या दोन्ही बाजुने स्पीड ब्रेकर करणे गरजेचे असल्याचे मत नागरीकांतुन व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.