Jalna Bribery Case : रेशनकार्ड सुरू करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच

भवानीनगर भागात रेशन दुकानदारावर लाचेची कारवाई
Jalna Bribery Case
Jalna Bribery Casepudhari photo
Published on
Updated on

जालना : बंद असलेले रेशन कार्ड पुन्हा सुरू करून त्यावर धान्य देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. १५) रंगेहाथ पकडले. शैलेश जीवनलाल कक्कड ( व्यवसाय स्वस्त धान्य दुकान चालक, रा. शास्त्री मोहल्ला, जुना जालना) असे कारवाई झालेल्या आरोपीचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ७९ वर्षीय पुरुष असून रोजमजुरीचे काम करतात. त्यांचे रेशन कार्ड बंद झाले होते. हे कार्ड पुन्हा सुरू करून त्यावर राशन देण्यासाठी आरोपी शैलेश कककड याने तक्रारदाराकडे २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.. याबाबत तक्रारदाराने १५ सप्टेंबर रोजी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली.

Jalna Bribery Case
Rare Celestial View : चंद्राजवळ दिसला तेजस्वी सितारा

तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आरोपीने पंचांसमक्ष तक्रारदाराकडे बंद असलेले रेशन कार्ड सुरू करून धान्य देण्यासाठी दोन हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला.

Jalna Bribery Case
Jalna Rainfall Shortage : कापूस, सोयाबीन, मका करपला; टेंभुर्णी मंडळात दुष्काळाचे सावट

मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास जुना जालना येथील भवानीनगरमधील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ६८ येथे आरोपीने तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने आरोपीला लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले.

शासकीय कामासाठी लाच मागितल्यास संपर्क करा

या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नागरिकांनी शासकीय कामासाठी लाच मागितल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news