Rare Celestial View : चंद्राजवळ दिसला तेजस्वी सितारा

गणेश चतुर्थीच्या दिवशी आकाशात निसर्गाची किमया
Rare Celestial View
चंद्राजवळ दिसला तेजस्वी सितारा pudhari photo
Published on
Updated on

टेंभुर्णी : गणेश चतुर्थीच्या आकाशात एक मनमोहक आणि दुर्मिळ खगोलीय दृश्य पाहायला मिळाले. सकाळच्या निळ्याशार आकाशात चंद्रकोरीसारखा सूर्य आणि त्याच्या अगदी जवळ एक तेजस्वी सितारा चमकताना दिसला. हे दृश्य पाहून अनेकांना जुन्या हिंदी गाण्याची आठवण झाली, चांद के पास जो सितारा है, वो सितारा हसीन लगता है.

टेंभुर्णी येथील एका इमारतीच्या टेरेसवरून हे सुंदर दृश्य एका निसर्गप्रेमीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आहे. फोटोत स्पष्टपणे दिसत आहे की, आकाशात चंद्रकोरीसारखा आकार आणि त्याच्या बाजूला एक लखलखता तारा आहे. सकाळच्या वेळी असे दृश्य दिसल्याने नागरिकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले होते.

Rare Celestial View
Digital Fertilizer System : शेतकऱ्यांच्‍या कृषी केंद्रावरील रांगा आता संपणार

खगोल अभ्यासकांच्या माहितीनुसार, आकाशात चंद्राच्या शेजारी दिसणारा हा सामान्य तारा नसून शुक्र ग्रह आहे. याला चंद्र आणि शुक्राची युती असे म्हणतात. कधी कधी सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यप्रकाशाच्या परावर्तनामुळे आणि लेन्समधील प्रकाशाच्या खेळामुळे सूर्य असा चंद्रकोरीसारखा दिसतो. त्यामुळे हा फोटो निसर्गाच्या अद्भुत किमयेचा एक उत्तम नमुना ठरला आहे. नागरिक या क्षणाचे साक्षीदार झाले.

आनंदाचे वातावरण

आजच गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होत आहे. अशा मंगलदिनी सकाळीच आकाशात दिसलेल्या या मनमोहक दृश्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेकांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत, बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच निसर्गाने दिलेली ही सुंदर भेट असल्याचे म्हटले आहे.

Rare Celestial View
Illegal Sand Transport : अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा जप्त, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news