Electricity bill recovery drive : महावितरणचा वीज बिल थकबाकीदारांना दणका

जिल्ह्यात 25 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित
Electricity bill recovery drive
महावितरणचा वीज बिल थकबाकीदारांना दणकाPudhari
Published on
Updated on

जालना : जिल्ह्यातील जवळपास सव्वा लाख ग््रााहकांकडे थकीत 133 कोटी रुपयांच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या महिनाभरात 25 हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. तसेच परस्पर वीज जोडल्यास थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे आणि कारवाई टाळावी, असे आवाहनही केले आहे. महावितरणने थकबाकीदारांना चांगलाच दणका दिल्याने वीज ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील एकूण 1 लाख 17 हजार 39 ग्राहकांकडे 133 कोटी 68 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. वसुलीसाठी संपूर्ण जिल्ह्यात महावितरणचे सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी सरसावले आहेत. अनेक ग््रााहक तातडीने बिल भरून सहकार्य करत आहेत. जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव खंडित करण्यात येत आहे.

Electricity bill recovery drive
Jalna News : गॅसच्या तुटवड्याने लग्न संकटात

स्मार्ट मीटर असलेल्या ग््रााहकांचा वीजपुरवठा ऑटो डिस्कनेक्ट होत आहे. नॉन-स्मार्ट मीटर असेल तर ते थेट काढून आणले जात आहे. थकबाकी भरल्यावरच नवीन स्मार्ट मीटरने वीजपुरवठा जोडण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात जालना मंडलातील 25 हजार 510 स्मार्ट मीटर असलेल्या ग््रााहकांचा वीजपुरवठा ऑटो डिस्कनेक्ट होत आहे. नॉन-स्मार्ट मीटर असेल तर ते थेट काढून आणले जात आहे. थकबाकी भरल्यावरच नवीन स्मार्ट मीटरने वीजपुरवठा जोडण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात जालना मंडलातील 25 हजार 510 ग््रााहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित करण्यात आला.

यानंतरही ग्राहक अनधिकृतरित्या वीज वापरत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. सुट्टीच्या दिवशीही मोहीम सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व ग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिले भरून सहकार्य करावे व संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महावितरणच्या छगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी सोमवारी (16 मार्च) मंठा व परतूर उपविभागास भेट देऊन वसुलीचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता सोमनाथ मठपती, उपकार्यकारी अभियंता राधेश्याम कुमावत, अमोल गडरी उपस्थित होते.

मार्च संपण्यास केवळ 15 दिवस राहिल्याने युद्धपातळीवर वसुलीचे काम करा. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर कुणी शेजाऱ्याकडून घेतल्यास आढळल्यास संबंधितांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करा तसेच वीज देणाऱ्या शेजाऱ्याचाही वीजपुरवठा खंडित करा. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर ग्राहकाचे दुसरे कनेक्शन असल्यास त्यावर थकबाकी वळती करून ती वसूल करा, असे निर्देश कछोट यांनी दिले.

Electricity bill recovery drive
गाळप क्षमता १५ हजार मेट्रिक टनापर्यंत वाढणार

वीजग््रााहकांनी तातडीने थकीत वीजबिल भरणे अत्यावश्यक आहे. अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. वीजबिल वसुलीत कुणी अडथळा आणल्यास किंवा बेकायदेशीररीत्या वीजपुरवठा जोडून घेतल्याचे आढळल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी थकीत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे.

पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, महावितरण, छत्रपती संभाजीनगर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news