Jalna News : गॅसच्या तुटवड्याने लग्न संकटात

मंगलकार्यालय चालकांची कसरत, स्वयंपाक चुलीवर
Gas Supply Update
Jalna News : गॅसच्या तुटवड्याने लग्न संकटातpudhari photo
Published on
Updated on

Jalna News: Marriage in crisis due to gas shortage

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : गॅसच्या टंचाईने लग्नसराईच्या धामधुमीत खळबळ उडाली आहे. गॅसअभावी लग्न सोहळे लांबणीवर पडण्याची भीती असतानाच पंचांगातील मुहूर्ताची गणिते पाहून वधू-वरांच्या पित्यांचे धाबे दणाणले आहे. मार्च ते जुलै या काळात मोजकेच मुहर्त असून यंदा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एकही मुख्य मुहूर्त नाही. त्यामुळे काहीही करा पण लग्न याच मुहूर्तावर उरका अशी आर्त साद मंगल कार्यालय चालकांना घातली जात आहे.

Gas Supply Update
धनगर समाजबांधवांचे मुंबईत आंदोलन

यंदाच्या लग्नसराईत मार्च ते जुलै या पाच महिन्यांत अवघ्या ३० मुख्य तिथी आहेत. तुलसी विवाहानंतर लग्नांची लगबग असते. मात्र यंदा नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांत लग्नाचे मुहूर्त नाहीत. त्यात मुहूर्त असूनही गॅसअभावी लग्न पुढे ढकलणे मान्य नाही. त्यामुळे मंगल कार्यालय चालक केटरर्सकडे आगाऊ रक्कम दिली असली तरी आता गॅस नसेल तर डिझेल शेगडी वापरा किंवा चुली पेटवा कशी असा प्रश्न निर्माण होत आहेत.

Gas Supply Update
गाळप क्षमता १५ हजार मेट्रिक टनापर्यंत वाढणार
पर्यायी व्यवस्थेवर भर गॅस टंचाई मोठी समस्या आहे. पण ग्राहकांचा दबाव वाढत असून वर्षभर मुहूर्त नसल्याने कोणालाही ठोस निर्णय घेता येत नाही. यामुळे आमच्या मंगल कार्यालयात बुकिंग झालेल्या लग्नांपैकी एकानेही लग्न पुढे ढकललेले नाही. त्यामुळे मंगल कार्यालय चालकांना तारेवरची कसरत आता करावी लागत असून डिझेल शेगड्या आणि लाकडांच्या चुलीची वापरण्याच्या तयारीत आहेत.
- राजेंद्र जाधव, मंगल कार्यालय चालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news