Chilli Crop : मिरचीवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव, गुणवत्ता घसरली; शेतकरी अडचणीत

भोकरदन तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
Chilli Crop
Chilli Crop : मिरचीवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव, गुणवत्ता घसरली; शेतकरी अडचणीतfile photo
Published on
Updated on

Incidence of bokdya on chillies, quality declined; Farmers in trouble

आन्वा, पुढारी वृत्तसेवाः मिरची पिकावर सध्यस्थीतीत बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे मिरची पिकाची गुणवत्ता घसरली आहे. परिणामी, भोकरदन तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

Chilli Crop
Har Ghar Tiranga : तिरंगा यात्रेतून 'हर घर तिरंगा' अभियान

दरम्यान भोकरदन तालुका मिरची शेती उत्पादक म्हणून ओळखल्या जातो. मात्र, यावर्षी मिरचीवर चुरडा, मुरडा आणि बोकड्या नावाच्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मिरचीची क्वालिटी घसरली असून तिचा दरही कमी झाला आहे.

यंदा पावसाचे उशीरा आगमन झाले असून वातावरण बदलामुळे मिरचीवर चुरडा, मुरडा आणि बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. या रोगामुळे मिरचीची उत्पादन क्षमता कमी झाल्याने मिरचीची वाढ खुंटली आहे.

Chilli Crop
Ladki Bahin :'लाडकी बहीण' योजनेचे बंद मानधन तात्काळ सुरू करा; अनोखे आंदोलन

मिरचीचे उत्पादन कमी सोबतच क्वालिटीही नसल्याने स्थितीत मिरची नाईलाजाने अनेक शेतकऱ्यांनी मिरची पिक उपटून फेकली आहेत. परिणामी, दिल्ली आणि बंगळुरुला जाणाऱ्या मिरचीची खेप यावर्षी जाणार नसल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.

मागील वर्षात उन्हाळी मिरचीचे चांगले उत्पन्न व भाव मिळाला. त्यामुळे ठिबक, मल्चिंग आणि मजूर असा लाखो रुपये खर्च करण्यात आला आहे. मिरची पीक चांगलेच बहरले होते; परंतु त्यावर कोकडा रोग पडला असल्याने यंदा उत्पादन मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहेत.
सचिन सिरसाठ, शेतकरी वाकडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news