Ladki Bahin :'लाडकी बहीण' योजनेचे बंद मानधन तात्काळ सुरू करा; अनोखे आंदोलन

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतर्गत के-वायसी व पडताळणीच्या कारणावरून बंद करण्यात आलेले पात्र महिलांचे मानधन तात्काळ पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी धर्मवीर सामाजिक क्रांतीचे प्रांताध्यक्ष रामभाऊ घोगरे यांनी अनोखे आंदोलन केले.
Ladki Bahin
जालनाfile photo
Published on
Updated on

Immediately resume the halted honorarium for the 'Ladki Bahin' scheme; unique protest

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतर्गत के-वायसी व पडताळणीच्या कारणावरून बंद करण्यात आलेले पात्र महिलांचे मानधन तात्काळ पूर्ववत सुरू करावे, या मागणीसाठी धर्मवीर सामाजिक क्रांतीचे प्रांताध्यक्ष रामभाऊ घोगरे यांनी घनसावंगी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात महिलांचा वेश परिधान करून अनोखे आंदोलन छेडले. त्यांच्या या आंदोलनामुळे शिबिरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले.

Ladki Bahin
FDA : गायी-म्हशींच्या किमती २० ते ३० हजारांनी वाढल्या !

राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ लाखो महिलांना मिळत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून केवायसी, पडताळणी व इतर तांत्रिक कारणे पुढे करून हजारो पात्र महिलांचे मानधन थांबविण्यात आल्याचा आरोप घोगरे यांनी केला. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील महिलांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील अनेक पात्र महिलांच्या खात्यावर कोणतीही स्पष्ट माहिती न देता मानधन जमा होणे बंद झाले आहे. शासनाने तातडीने सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर थकीत मानधन जमा करून योजना पूर्ववत सुरू करावी. तसेच केवायसी प्रक्रियेमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना त्वरित न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. महिलांचा वेश परिधान करून करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे समाधान शिबिरात उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले गेले.

Ladki Bahin
Beed News : वादानंतर बँक ऑफ महाराष्ट्राचे आडमुठे धोरण

आंदोलनाचा इशारा

आंदोलनानंतर रामभाऊ घोगरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी इशारा देताना सांगितले की, पात्र महिलांचे बंद झालेले मानधन तात्काळ सुरू न झाल्यास धर्मवीर सामाजिक क्रांतीच्या वतीने जिल्हाभर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल. महिलांच्या हक्कांसाठी हा लढा आणखी व्यापक केला जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news